Breaking News

राज्यात येत्या सोमवारपासून पाच स्तरांमध्ये निर्बंध उठविण्यात येणार, आदेश जारी , जाणून घ्या काय सुरु आणि काय बंद राहणार

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: June 5, 2021 4:14 pm
|

मुंबई,:- राज्यात कोविड रुग्णांची परिस्थिती वेगवेगळी आहे. प्रत्येक ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर आणि ‘रुग्ण असलेले’ ऑक्सिजन बेड यांची संख्या वेगवेगळी असून येत्या सोमवारपासून निर्बंध उठविण्याची प्रक्रिया सुरू करताना याच निकषांवर विविध पाच स्तरांमध्ये निर्बंध उठवण्यास संबंधी राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांना विविध प्रशासकीय घटकांमध्ये विभाजित करण्यात आले असून अटी व शर्तींच्या अधीन राहून ही अनलॉक प्रक्रिया राबविली जाणार आहे. कोरोनो पॉझिटिव्हिटी रेट आणि भरलेल्या ऑक्सिजनची बेडची संख्या यांचा आढावा घेऊन प्रत्येक शहर अथवा जिल्ह्याला पाच पैकी योग्य त्या गटात समाविष्ट केले जाईल. दर आठवड्याला कोरोनो पॉझिटिव्हिटी रेट आणि भरलेल्या ऑक्सिजनची बेडची संख्या यांचा आढावा घेऊन निर्णयाची समीक्षा स्थानिक पातळीवर केली जाईल.

पहिला गट – कोरोनो पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के, २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरले आहेत

दुसरा गट – कोरोनो पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के, ४० टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरले आहेत

तिसरा गट – कोरोनो पॉझिटिव्हिटी रेट ५ ते १० टक्के, ४० टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड भरले आहेत

चौथा गट – कोरोनो पॉझिटिव्हिटी रेट १० ते २० टक्के, ६० टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड भरले आहेत

पाचवा गट – कोरोनो पॉझिटिव्हिटी रेट २० टक्क्यांपेक्षा जास्त, ७५ टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड भरले आहेत

काय सुरू आणि काय बंद?

पहिला गट –

मास्कसक्ती लागू आणि सोशल डिस्टंस राखा. १०० टक्के अनलॉक. रेल्वे, बससह सर्व प्रकारची वाहतूक सामान्यांसाठी सुरू. सर्व दुकानं आणि व्यवसाय सुरू.

दुसरा गट –

मास्कसक्ती लागू आणि सोशल डिस्टंस राखा. दुकानं, मॉल सुरू. हॉटेल आणि रेस्टॉरंट तसेच नाट्यगृह आणि सिनेमागृह येथे ५० टक्के लोकांना परवानगी. खेळाची मैदाने सकाळी ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ९ सुरू राहतील. शूटिंग सुरू. लग्नासाठी आसन क्षमतेच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १०० जणांच्या उपस्थितीला परवानगी. अंत्यविधीला उपस्थित राहणाऱ्यांसाठी संख्येचे बंधन नाही. निवडणूक, बैठकांवर निर्बंध नाही. जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना ५० टक्के क्षमतेने परवानगी. सार्वजनिक वाहतूक सेवा १०० टक्के क्षमतेने सुरू होईल. आसन क्षमतेइतकेच प्रवासी प्रवास करू शकतील. या भागात जमावबंदी लागू असेल.

तिसरा गट –

मास्कसक्ती लागू आणि सोशल डिस्टंस राखा. अत्यावश्यक दुकानं संध्याकाळी ४ पर्यंत आणि इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ४ पर्यंत सुरू राहणार.

चौथा गट –

मास्कसक्ती लागू आणि सोशल डिस्टंस राखा. अत्यावश्यक दुकानं संध्याकाळी ४ पर्यंत सुरू. इतर दुकानं बंद.

पाचवा गट –

मास्कसक्ती लागू आणि सोशल डिस्टंस राखा. अत्यावश्यक दुकानं संध्याकाळी ४ पर्यंत सुरू. इतर दुकानं बंद.

तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या गटासाठी कोरोना प्रोटोकॉलचे इतर निर्बंध कायम राहतील.

कोणत्या गटात कोणता जिल्हा?

पहिल्या गटातील जिल्हे – अहमदनगर, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, ठाणे, वर्धा.

दुसऱ्या गटातील जिल्हे – औरंगाबाद, गडचिरोली, हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी.

तिसऱ्या गटातील जिल्हे – अकोला, अमरावती, बीड, वाशिम, यवतमाळ.

चौथ्या गटातील जिल्हे – पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर.

साधारण मार्गदर्शक तत्त्वे:-

पहिल्या स्तरासाठी नियमित सुपर स्प्रेडर, जे लोकल ट्रेनने प्रवास करतात, किंवा लग्नसमारंभातील गर्दी.

स्तर २ साठी गर्दीच्या ठिकाणी कमीत कमी हजेरी, सार्वजनिक ठिकाणी गटांमध्ये जमा होण्यास प्रतिबंध, तर तिसऱ्या स्तरासाठी पाच वाजल्यानंतर दररोज तसेच आठवड्याच्या शेवटी कमीत कमी वावर / आवागमन.

स्तर ४ साठी पाच वाजल्यानंतर तसेच आठवड्याच्या शेवटी आणि आठवडाभर कोणतेही आवागमन किंवा हालचाली वर पूर्णता बंदी. फक्त आवश्यक आणि आपत्कालीन कारणांसाठी मुभा

पाचव्या स्तरात फक्त आपत्काल आणि आवश्यक कारणांसाठी ये-जा करण्याची परवानगी

आवश्यक सेवेमध्ये खालील गोष्टी समाविष्ट असतील :

इस्पितळ, चाचणी केंद्र, दवाखाने, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालय, औषध केंद्र, औषध निर्माण कंपन्या इतर वैद्यकीय सुविधा देणारे तसेच त्याचे उत्पादन आणि वितरण करणारे, त्याची वाहतूक करणारे आणि या चैन मध्ये सामील असणारे सर्वांचा समावेश होईल. त्याचप्रमाणे लसीचे वितरण, सेनीटायझर, मास्क, वैद्यकीय उपकरण व इतर कच्चा माल यालाही आवश्यक सेवा म्हणून गृहीत धरले जाईल.

पशुवैद्यकीय सेवा, जनावरांसाठी आश्रय व पाळीव प्राण्यांसाठी खाद्य दुकाने.

वन विभागाद्वारे घोषित केलेले वन विभागाचे काम

वायु वाहन सेवा- यात विमान, विमानतळ, त्यांची देखरेख, विमान मालवाहतूक, इंधन व सुरक्षा यांचा समावेश होईल.

किराणा दुकाने, भाजी दुकान, फळांचे दुकान, दूध डेरी, बेकरी, मिठाईचे दुकान यांचाही समावेश असेल.

कोल्ड स्टोरेज आणि वखार सेवा.

सार्वजनिक वाहतूक- यात विमान, रेल्वे, टॅक्सी, रिक्षा आणि सार्वजनिक बस.

विविध देशांच्या मुत्सद्यांच्या कार्यालयात यातील कार्य.

स्थानिक प्रशासनातर्फे मान्सूनपूर्व काम

स्थानिक प्रशासनातर्फे सर्व सार्वजनिक सेवा

रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि त्याच्याशी संबंधित इतर सेवा

सेबीशी संबंधित सर्व कार्यालय

दूरध्वनी सेवे साठी लागणारी सेवा

मालवाहतूक

पाणी पुरवठा सेवा

कृषीशी संबंधित सर्व काम ज्यात बी बियाणे खत कृषी साहित्य आणि उपकरणांचा समावेश असेल.

सर्व वस्तूंचे आयात-निर्यात

ई-कॉमर्स फक्त आवश्यक सेवा आणि सामान

अधिस्वीकृती धारक पत्रकार

पेट्रोल पंप आणि पेट्रोलची संबंधित उत्पादक

सर्व मालवाहतूक सेवा

डाटा केंद्र, क्लाऊड सेवा, माहिती तंत्रज्ञान व त्याच्याशी संबंधित सेवा

शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा

वीज आणि गॅस पुरवठा सेवा

एटीएम

डाक सेवा

बंदरे आणि त्याच्याशी संबंधित कार्य

कस्टम हाऊस एजंट, बहुआयामी वाहतूक प्रदाता, जीवनावश्यक औषधी आणि इतर औषध उत्पादनाशी संबंधित आहेत

कच्चामाल पॅकेजिंगसाठी बाल तयार करणारे कंपन्या

मान्सून आणि पावसाळ्याची निगडीत उत्पादन करणारे कंपनी

स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासनातर्फे आवश्यक घोषित केलेल्या सेवा


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: June 5, 2021, 4:14 pm
Tags:
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *