Breaking News

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर प्राणघातक हल्ला

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 25, 2021 7:22 pm
|

पुणे : अलिकडेच विवाहबद्ध झालेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या वडिलांवर पुण्यातील निगडीत प्राणघातक हल्ला झाला आहे. हल्लेखोर सोनालीचा चाहता असून त्याने सोनालीच्या वडिलांवर चाकूने हल्ला केला. वडिल मनोहर कुलकर्णी ( वय 63) यांनी अजयला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजयने त्यांच्यावरच चाकूने हल्ला केला व त्या झटापटीत ते किरकोळ जखमी झाले आहेत.

पुण्यातील निगडी प्राधिकरण भागातील सेक्टर क्रमांक 25 येथे सोनाली कुलकर्णीच्या वडिलांचे घर आहे. आरोपी अजय शेगटे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दारात आला. त्यावेळी सोनालीचे आई-वडील घरात होते. रहिवाशांनी अजयला पोलिसांच्या ताब्यात दिले. चोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याची तक्रार कुलकर्णींनी पोलिसांकडे दिली आहे. आरोपीकडे खोटे पिस्तूल आणि चाकू पोलिसांना आढळले आहे. अजयने आपण सोनाली कुलकर्णीचा फॅन असल्याचे पोलिसांना सांगितले. या संदर्भात निगडी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आले असून पोलिस अधिक तपास करत आहेत.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 25, 2021, 7:22 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *