मराठा आरक्षणावर सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेते मार्ग काढण्याऐवजी टिका करण्यात व्यस्त :संभाजीराजेंनी व्यक्त केली खंत !
नांदेड : सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाज आक्रमक झाला असून तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. .तर, दुसरीकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या भूमिकेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील रंगले आहेत. यामुळे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राजकारणासाठी नाही तर मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल याचा अभ्यास करण्यासाठी व तज्ज्ञांची मते जाणून घेण्यासाठी दौरा करत असल्याचे स्पष्ट केले आहे .
संभाजीराजेंच्या महाराष्ट्र दौऱ्याची काल सुरुवात झाली. आज नांदेडमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून आपल्याभुमिकेबाबत भाष्य केलं. यावेळी त्यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीसह विरोधक भाजप व इतर नेत्यांवर देखील निशाणा साधला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोरोना काळातील गांभीर्य ओळखून संयम बाळगण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, यानंतर चाललेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर संभाजीराजे देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्र आणि राज्य शासनावर बोलण्यापेक्षा मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल यावर विचारमंथन होणे आवश्यक आहे. मला गटातटाच्या राजकारणामध्ये पडायचे नाही. आरक्षण रद्द झाल्यानंतर सत्ताधारी ते विरोधी पक्षातील नेते काहीच बोलत नाहीत. ही शोकांतीका असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनाही मी सूचना केल्या होत्या. परंतु अनेक्झर ट्रांजेक्शन केले नाही. तसे झाले असेल तर आरक्षण रद्द झाले नसते असेही संभाजीराजे यांनी अशोकराव चव्हाण यांना टोला लगावला.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 25, 2021, 6:41 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY