Breaking News

म्युकरमायकोसिसच्या राज्यातील प्रत्येक रुग्णाची नोंद होणार : राजेश टोपे

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 25, 2021 2:02 pm
|

मुंबई : भारतामध्ये कोरोना संकटाचा समाना करता करता अजून एक नवं संकट गडद होत आहे ते म्हणजे Mucormycosis. Mucormycosis म्हणजेच काळी बुरशी हा आजार जीवघेणा असल्याने त्याबाबत सामान्यांच्या मनात अधिक चिंता आहे. या आजारासंदर्भात मंत्रालयात मंगळवारी महत्त्वाची बैठक पार पडली.. या बैठकीनंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. यामध्ये त्यांनी सद्याच्या राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्याचीही माहिती दिली. या आजाराशी देखील सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली जात आहे अशी माहिती राजेश टोपेंनी दिली.

या बैठकीनंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहिती देताना आता या आजराबाबत जन जागृती वाढवण्याची गरज असल्याचं म्हणताना बैठकीत नेमके कोणकोणते निर्णय झाले याची देखील माहिती दिली आहे. दरम्यान राजेश टोपेंनी दिलेल्या माहितीनुसार आता महाराष्ट्रामध्ये Mucormycosis या आजाराच्या प्रत्येक रूग्णांची नोंद केली जाणार आहे.

आरोग्य मंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकारपरिषदेतील महत्वाचे मुद्दे….

जनआरोग्य योजनेत म्युकर मायकोसिसचा समावेश करण्यात आला आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत म्युकरमायकोसिस आजारावर मोफत उपचार करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

म्युकरमायकोसिसच्या राज्यातील प्रत्येक रुग्णाची नोंद होणार आहे.

म्युकरमायकोसिस आजाराबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

म्युकरमायकोसिसवरील एम्फोटेरेसीन-बी या औषधाचं रुग्णांच्या प्रमाणानुसार वाटप करण्यात आलं आहे.

एक जून पर्यंत एम्फोटेरेसीन-बीच्या 60 हजार लसी उपलब्ध करणार.

म्युकरमायकोसिस आजारावर उपचारासाठी लागणाऱ्या एम्फोटेरेसीन-बी या औषधासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

म्युकर मायकोसिस आजाराचे उपचार खाजगी रुग्णालयात मोफत किंवा कमी दरात करण्याचे प्रयत्न राज्य सरकारचे प्रयत्न आहेत.

18 जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या जिल्ह्यातील home isolation बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

contact Tracing वाढवण्याच्या सूचना दिल्यात. राज्यात आशा वर्कर्सना कोरोना चाचण्या करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत लॉडाउनचा निर्णय घेतला जाणार आहे. याबैठकीत नियम आणि अटी ठरवल्या जातील.

लॉकडाउन वाढवला जाईल की निर्बंध शिथील करण्यात येणार हे शुक्रवारी स्पष्ट होणार आहे.

राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 93 टक्क्यांवर, तर पॉझिटिव्हिटी रेट 12 टक्क्यांवर

राज्यात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 1.5 टक्क्यांपर्यंत घटला आहे.

लसीकरणाच्या ग्लोबल टेंडरला कोणत्याही राज्याला प्रतिसाद नाही. त्यामुळे केंद्रानं ग्लोबल टेंडर काडून राज्यांना लस द्यावी.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 25, 2021, 2:02 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *