राशीभविष्य | या राशीच्या व्यक्तींनी डोक शांत ठेवून विचारपूर्वक कृती करणे आवश्यक
मेष: या राशीतील व्यक्तींचा आजचा दिवस उत्साहात जाईल. मित्र परिवारासह बाहेर जाण्यास वेळ काढा. कामे करताना घाईने निर्णय घेऊ नका. आई-वडिलांची साथ लाभेल. आज जे कोणतं काम कराल त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. पैशांच्या बाबतीत अनेक विचार मनात येतील. ज्या आधारे तुम्ही तातडीनं एखादा निर्णय घ्याल.
वृषभ- आज धैर्यानं काम करा. दिवस तुम्हाला आनंदात घालवता येणार आहे. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. आई-वडिलांकडून साथ लाभेल. दिवसभर पैशांचा विचार करत राहाल. धनलाभ होण्याचा योग आहे. एखादं नवं काम पूर्णत्वास न्याल. प्रगतीचाच विचार मनात घर करुन असेल. आरोग्याची काळजी कमी होईल.
मिथुन-मिथुन राशीतील व्यक्तींनी प्रकृतीकडे लक्ष द्या. जास्त पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीला वेळ द्या. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका. एखादं महत्त्वपूर्ण काम करण्याला प्राधान्य द्या. जुनी कामं आवरण्याला प्राधान्य द्या. अविवाहितांसाठी प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.
कर्क- परिवारासंबंधित कामे पूर्ण करा. प्रकृतीकडे लक्ष द्या आणि वेळेवर आजाराचे निदान करा. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा.अचानक धनलाभ होईल. अडकलेले पैसेही परत मिळतील. मित्रांना मदत करण्यासाठी तयार राहा. कोणासोबत कोणताही वाद असल्यास तो मिटवण्याचा प्रयत्न करा.
सिंह – आज या राशीतील व्यक्तींनी विचारपूर्वक वागा. घरातील ताणतणामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारासह वेळ घालवा.आर्थिक परिस्थिती सुधारेल. काही मोठी आणि आवश्यक ते बदल घडतील. महत्त्वाकांक्षा वाढेल. मेहनत करा, समजुतदारपणे निर्णय़ घ्या. फायदा होईल. मनावरील दडपण कमी होईल.
कन्या- कन्या राशीतील व्यक्तींनी आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. मित्रपरिवारासह आदराने वागा. घरातील मंडळींची साथ लाभेल. विचारपूर्वक निर्णय घ्यानोकरी किंवा व्यवसायामध्ये एखादं नवं पाऊल उचलण्याची शक्यता आहे. कामात नवे प्रयोग कराल. जोडीदारासमवेत काही बेत आखाल. कौटुंबीक सुख मिळेल.
तुळ- तुळ राशीतील व्यक्तींनी खाण्यावर नियंत्रण ठेवा. तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करा. घरातील मंडळींचे विचार पटणार नाहीत. परंतु त्या विचारांचे पालन करुन योग्य ती कृती करा. मित्र मंडळीची गाठभेट होण्याची शक्यता आहे. विचाराधीन कामं पूर्ण होतील. आज अडकलेली कामं पूर्णत्वास नेण्यासाठी चांगला दिवस आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. कर्जरुपी दिलेले पैसे परत मिळणार आहेत.
वृश्चिक – या राशीच्या व्यक्तींना आज कंबर दुखी किंवा मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे झाल्यास दुर्लश्र करु नका. तसेच आजच्या दिवशी आराम केल्यास उत्तम. अचानक खर्च वाढू शकतो. घरात थोडे वादाचे वातावरण तयार होईल. तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. काही अशा गोष्टी समोर येऊ शकतात ज्यांचा तुम्हाला मोठा फायदा होणार आहे. दिवस चांगला आणि भरभराटीचा आहे.
धनु- धनु राशीतील व्यक्तींनी आज प्रेमप्रकरणी चुका होणार नाही याची दक्षता घ्या. घरातील मंडळींचे आदेश पाळा. ताणतणाव कमी करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या.नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी आजचा दिवस चांगला आहे. नव्या नोकरीमध्ये यश मिळेल. तुमच्या मदतीसाठी सर्वजण तयार असतील.
मकर- आजचा दिवस मकर राशीतील व्यक्तींशी उत्तम असणार आहे. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी कळेल.घरातील मंडळींशी आदराने वागा.शुभ उपाय- पक्षांना अन्नदान करा.धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्यासाठी आजचा दिवस भरभराटीचा आहे. कुटुंबाला वेळ देण्यासाठी ही योग्य संधी आहे. एखादी शुभवार्ता मिळेल.
कुंभ- आज तुम्हाला डोक शांत ठेवून विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवसायात पैशांचे व्यवहार जपून करा. घरातील वयोवृद्धांचा मान राखा. थोडा अश्यकतपणा वाटेल पण आराम केल्यास उत्साहित वाटेल.जुने वाद मिटतील. स्वत:ची काळजी घ्या. सक्रियता वाढेल. समाज आणि कुटुंबात तुमचा मान वाढेल. एखादी कल्पना डोक्यात घर करु शकते. खर्चावर ताबा ठेवा.
मीन- आजच्या दिवशी मीन राशीतील व्यक्तींसाठी आजचा दिवसाची सुरुवात उत्तम होणार नाही. परंतु काळजीपूर्वक कामे केल्यास चुका होण्याची शक्यता टळेल. आई-वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.कामाच्या व्यापासोबतच जबाबदारी वाढेल. दिवसभर व्यग्र असाल. अचानक यशशिखरांवर पोहोचण्याची संधी आहे. बऱ्याच अंशी तुम्ही यशस्वी ठराल. एखाद्या कार्यक्रमाचा बेत लगेचच आखला जाऊ शकतो.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 25, 2021, 11:41 am- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY