मराठा आरक्षण : मूक नव्हे तर ‘बोलका’ मोर्चा काढणार; विनायक मेटेंचा इशारा
पुणे : राज्य शासनाच्या गाढवपणामुळे मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले.. याविरोधात येत्या ५ जूनपासून मोर्चे काढण्यात येणार आहे. यावेळीचे मोर्चे हे मुकमोर्चा नसून बोलके असणा आहेत, असे शिवसंग्रमा पक्षाचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना मेटे म्हणाले, मराठा समाजाचे आरक्षण रद्द होण्यामागे राज्य सरकारचा गाढवपणाच कारणीभूत आहे. प्रामुख्याने आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यामुळे आरक्षण रद्द झाले आहे. या विरोधात मराठा समाजात संताप आहे. हा संताप मूक मोर्चांद्वारे बाहेर निघणार आहे. हा मोर्चा कोणत्याही एका संघटनेचा नसून संपूर्ण समाजाचा असणार आहे.
सारथी संस्थेत गेल्या एक-दीड वर्षांपासून २४१ विद्यार्थ्यांना पीएच.डी साठीचे अनुदान मिळाले नाही, त्यामुळे आजच्या बैठकीत ते देण्यासाठी चर्चा झाली असे सांगून मेटे म्हणाले, येत्या १ जूनला सारथी संचालकांच्या बैठकीत विद्यार्थ्यांचे गुणांकन तपासून फेलोशिप मानधन देण्यात येणार आहे. तसेच दोन वर्षांत पीएच. डी पूर्ण करण्याबाबत विद्यार्थ्यांना बंधनकारक करणार आहे. सारथी संस्थेत सध्या ४-५ कर्मचारी आहेत, पुढील दोन महिन्यांत ते वाढवून ४० अधिकारी आणि कर्मचारी भरणार आहेत. सारथीला स्वत:ची जागा मिळावी म्हणून अजित पवार यांनी प्रयत्न केले आहेत. लवकरच या जागेचे प्लॅन तयार करणार आहोत.
कॉँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांना ओबीसींचा नेता होण्याची घाई झाल्याने दोन समाजात तेढ निर्माण होतील अशी वक्तव्ये करत आहे. कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींचा होता होणार ते ठरवायचे आहे, असा टोलाही त्यांनी मारला.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 24, 2021, 6:46 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY