Breaking News

पंतप्रधान मोदींना वाटतं मराठा आरक्षण राज्याचा विषय, त्यामुळे संभाजीराजेंना भेटले नाहीत: चंद्रकांत पाटील

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 24, 2021 5:09 pm
|

मुंबई : सुप्रीम कोर्टानं (Supreme court) मराठा आरक्षण (Maratha reservation) रद्द ठरवले आहे.यापार्श्वभूमीवर मराठा समाजाने पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे . यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिकिया दिली आहे . ते म्हणाले , मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटते. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांची आजपर्यंत संभाजीराजे छत्रपतींशी भेट होऊ शकली नाही, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

खा. संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मराठा आरक्षणाबाबत भेट मागितली पण ती त्यांना मिळाली नाही असे एका पत्रकाराने सांगितले असता मा. प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, मराठा आरक्षणाचा विषय राज्य सरकारच्या अधिकारातील असल्याने केंद्र सरकारची भेट घेऊन उपयोग नाही. याबाबत केंद्र सरकारची भूमिका ही घटनेच्या १०२ व्या दुरुस्तीपुरती मर्यादित आहे. या घटनादुरुस्तीनंतरही राज्यांचे एखाद्या जातीला मागास म्हणून आरक्षण देण्याचे अधिकार कायम आहेत, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. तसेच या संदर्भातील न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी फेरविचार याचिका केंद्र सरकारने दाखल केली आहे. तथापि, मराठा समाज मागास आहे आणि पन्नास टक्क्यांच्या वर जाऊन या समाजाला आरक्षण देण्यासारखी अपवादात्मक स्थिती आहे, हे सिद्ध करण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच आहे. ते म्हणाले, राज्य सरकारने सारथी ची वाट लावली आहे . मराठा आरक्षणासाठी आंदोलन झालं तर भाजपचे कार्यकर्ते त्यामध्ये पक्षाचा झेंडा आणि बॅनर बाजूला ठेवून सहभागी होतील. असे पाणी म्हटले आहे. मराठा आरक्षणाविषयी संभाजीराजे यांनी त्यांचं मत मांडलं आहे. विनायक मेटे यांनीही आपली बाजू मांडली असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मण समाजासाठी अमृत महाडमंडळाची स्थापना केली. पण ते अजूनही सुरुच झालेले नाही. यामध्ये सरकारच्या दुरदृष्टीचा अभाव आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासाठी अनेक पत्र पाठवण्यात आली. मात्र, यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळाले नसल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा व करिअरचा विचार करता दहावी, बारावी आणि पदवीच्या परीक्षा व्हायला हव्यात अशी भाजपाची भूमिका त्यांनी मांडली. या परीक्षा घेताना कोरोनाच्या संकटाचा विचार करून उपाय योजना कराव्यात, असेही ते म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी भाजप खासदार संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) आजपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत. या दौऱ्यात ते राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतच्या भावना जाणून घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट हवी होती. त्यासाठी मी चारवेळेला पंतप्रधान मोदींना पत्रही दिले. मात्र, अद्याप त्यांनी मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 24, 2021, 5:09 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *