Breaking News

Maratha Reservation : खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा शाहू समाधीस्थळाचं दर्शन घेऊन कोल्हापुरातून दौरा सुरु

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 24, 2021 3:56 pm
|

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला असून समाजातील तज्ञ आणि जाणकारांशी चर्चा करणार आहेत . दौरा सुरू करण्याआधी कोल्हापुरातील राजर्षी शाहूं महाराजांच्या समाधीस्थळाला नतमस्तक होऊन या दौऱ्याला सुरुवात करण्यात आली आहे. कोल्हापुरात आज मराठा क्रांती मोर्चा चे पदाधिकारी आणि तालीम संस्थांसोबत संभाजीराजे चर्चा करणार आहेत . मराठवाडा, खान्देश, मुंबईमध्ये संभाजीराजे दौरा करणार आहेत.

मराठवाडा आणि खान्देशात जाऊन तिथे समाजाची भावना जाणून घेणार आहे. मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलनापेक्षा तोडगा काढण्यावर भर असणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मराठा आरक्षणाबाबत मी अनेक कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली आहे. त्यांनी काही सल्ले दिले आहेत. त्याची माहिती सरकारला देणार आहे. आंदोलन हा एक भाग असू शकतो. पण मराठा आरक्षणाबाबत सरकारला काय सूचना करता येईल? मराठा आरक्षणावर काय कायदेशीर मार्ग आहे? याची माहिती घेण्यासाठी हा दौरा करण्यात येत आहे. त्यातून समाजाच्या व्यथाही समजून घेता येणार आहे, कोरोनाच्या काळात आंदोलन करणं चुकीचं आहे. 27 किंवा 28 मे रोजी मुख्यमंत्र्यांसह प्रमुख नेत्यांना भेटून चर्चा करणार असल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. राज्य आणि केंद्र दोघांनी समन्वयाने यातून मार्ग काढावा मराठा समाजाला वेठीस धरू नये असं संभाजीराजे म्हणाले. तसंच यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी भूमिका घेणे गरजेचे आहे, असंही ते म्हणाले.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 24, 2021, 3:56 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *