इंडियन कोरोना’ म्हणणे आले अंगलट; मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याविरोधात भाजपच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल(video)
भोपाळ : ‘इंडियन कोरोना’ (Indian Corona) शब्द वापरून यांनी खोटी माहिती पसरविल्याच्या आरोपात काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) यांच्याविरुद्ध आयपीसी कलम १८८ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या कलम ५४ नुसारगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपने गुन्हे अन्वेषण विभागाला कमलनाथ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचं निवेदन दिलं होतं. त्यानुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कमलनाथ यांनी उज्जैन येथे एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी कोरोनावरून भाजपवर टीका केली होती. कमलनाथ म्हणाले होते की, जानेवारी २०२० मध्ये कोरोना आला. तेव्हा त्याला ‘चायनीज कोरोना’ म्हटले होते. आज आपण कुठे पोहोचलो आहोत? ‘इंडियन कोरोना’ येईल म्हणून ब्रिटनच्या पंतप्रधानांनी भारतात येने टाळले. विद्यार्थी आणि भारतीय नागरिक ‘इंडियन कोरोना’ घेऊन येतील म्हणून त्यांना रोखून ठेवले आहे. आता कोरोनाला जगात ‘इंडियन कोरोना’ नावाने ओळखले जाईल, असं कमलनाथ यांनी म्हटलं होतं. तसेच सरकारने लाखो लोकांच्या मृत्यूची आकडेवारी लपवल्याचा दावाही कमलनाथ यांनी केला होता. त्यांचं हे विधान आक्षेपाहार्य असल्याचं भाजपने म्हटलं आहे. भाजपने रविवारी दुपारी हे निवेदन गुन्हे अन्वेषण विभागाला दिलं होतं. त्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाने संध्याकाळी कमलनाथ यांच्याविरोधात दोन कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. पोलिसांच्या माहितीनुसार ही दोन्ही कलमे जामीनपात्रं आहेत.
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पत्रकार परिषदेमध्ये काय म्हटले होते पहा
जो लोग कहते थे कि मेरा भारत महान बनाएँगे ,उनके नाकारापन के कारण आज हमारा देश , विश्व भर में बदनाम हो रहा है और हम इस पर दुःख , चिंता व्यक्त करे , सच कहे तो हमको ये देशद्रोही कहेंगे ,हम पर FIR करवाएँगे ?
— Kamal Nath (@OfficeOfKNath) May 24, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 24, 2021, 3:05 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY