Breaking News

चिमुकल्याला झोप यावी म्हणून डॉक्टरानी आई होऊन म्हटली सुंदर अंगाई ; पाहा Video Viral

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 24, 2021 1:51 pm
|

धुळे : सध्या सोशल मीडियावर धुळ्यातील एका डॉक्टरांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बाळाला झोप यावी यासाठी डॉक्टर बाळाला हातात घेऊन गाणं गाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ आहे धुळ्याच्या शहरातल्या संगोपन बाल रुग्णालयामधील डॉ. अभिनय दरावडे यांचा.डॉ. अभिनय दरावडे यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांच्या रुग्णालयात नुकतंच एक बाळ जन्माला आलं आहे. या बाळाचं वजन अवघं 900 ग्रॅम इतकं आहे. वजन कमी असल्यामुळे सुरुवातीचे काही दिवस या बाळाची प्रकृती नाजूक होती. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नानंतर आता बाळाची प्रकृती व्यवस्थित झाली असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान ,धुळ्यातले डॉक्टर अभिनय दरवडे आजारी बाळाचे आई बनतात. काही दिवसांच्या एका बाळाला झोप येत नव्हती, तो सारखा रडत होता, , इतर बाळांना त्रास नको म्हणून ते रडणाऱ्या बाळाला त्यांच्या केबिनमध्ये आणतात. त्यानंतर त्यांच्या मधूर आवाजात त्या बाळाला गाणं ऐकवतात आणि डॉक्टरांकडून त्याने गाणी म्हणून घेतल्यावर ते बाळ शांत झोपलं… अनेक बाळांना त्यांनी आई अंगाई गाते तसं गाणं ऐकवून शांत केलं आहे. इवल्याशा बाळाला ते गाणं काही समजलं असेल अशी शक्यता कमीच आहे. पण गाण्याचा आवाज आणि डॉक्टरांची त्यामागील भावना बाळाने बरोबर ओळखल्या. या डॉक्टरांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर हे डॉक्टर चर्चेत आले.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 24, 2021, 1:51 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *