बीडमध्ये मराठा आरक्षणासाठीचा संघर्ष मोर्चा ५ जूनला निघणारच’: आमदार विनायक मेटेंचा निर्धार

बीड :सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षण संदर्भात 5 जूनला पहिला मोर्चा बीडमध्ये निघणारच असा निर्धार मराठा नेते आमदार विनायक मेटे यांनी केला आहे. याच अनुषंगाने बीडमध्ये मोर्चाच्या पूर्वतयारीची बैठक संपन्न झाली आहे. सध्या महाराष्ट्रातील राजकारण या मुद्यावरून चांगलेच तापलेले आहे.
बैठकीला जिल्ह्यातील निवडक मराठा समन्वयकांची हजेरी होती. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर बीडमध्ये मराठा समाजाचा संताप व आक्रोश दाखवण्यासाठी 5 जून रोजी पहिला मोर्चा होत आहे. या मोर्चाची तयारी युद्धपातळीवर सुरू असून पाच तारखेला मोर्चा होणारच असा ठाम विश्वास आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की 5 जूनला सकाळी 10:30 वाजता मोर्चा बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार आहे. या मोर्चाला परवानगी मिळो अथवा नाही पण मोर्चा होणारच असा निर्णय बैठकीत झाला आहे.
या वेळी या मोर्चाचे नाव मराठा क्रांती संघर्ष मोर्चा लढा आरक्षणाचा असे असणार आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा मोर्चा निघणार आहे. मोर्चा यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. जनजागृतीसाठी तीन टप्पे, बीड शहर- तालुका आणि जिल्हा पातळीवर काम सुरू आहे. जिल्ह्यात प्रचार दौरा वैद्यकीय सेवेसह आजपासून सुरू झाला आहे. यासाठी 9 कमिटया स्थापन करण्यात आल्या आहेत. यावेळी मूक मोर्चा नसणार तर संघर्षशील मोर्चा असणार आहे. सरकारवर दबाव आणण्यासाठी हा मोर्चा असणार आहे. मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागण्यांसह इतर महत्त्वाच्या मागणीसाठी मोर्चा निघणार आहे. तसेच जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत आरक्षणाचा लढा सुरूच राहील असे देखील आमदार विनायक मेटे म्हणाले.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 23, 2021, 9:05 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY