तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका; मुख्यमंत्र्यांनी पालकांना म्हटले -घाबरुन जाण्याची गरज नाही
मुंबई : देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असून त्यामुळे लहान मुलांना होणारा कोरोनाचा संभाव्य धोका रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील यांनी आज राज्यातील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर्सशी संवाद साधला. यासाठी रविवार २३ मे रोजी दुपारी १२ वाजता समाजमाध्यमांवर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पालकांना धीर देत घाबरुन जाण्याची गरज नसल्याचे म्हटले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना विरुद्ध आपण जी लढाई लढतो आहोत त्यात पूर्ण यश नाही, पण रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवण्यात आपल्याला यश येत आहे. यात तुम्ही सगळे डॉक्टर्स, आरोग्य यंत्रणा, सरकारला सहकार्य करणारे सर्व पक्षांचे लोक, सर्वसामान्य नागरिक यांचे हे यश आहात, मी केवळ निमित्तमात्र आहे. कोरोन विषाणूची जशी संसर्गाची साखळी असते तशी आपण आपली देखील एक घट्ट साखळी तयार करून, एकजुटीने या विषाणूचा मुकाबला करू..
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, घाबरू नका, चिंता करू नका, आपल्या फॅमिली डॉक्टर , ज्याला मी “ माझा डॉक्टर” असे म्हणतो त्याला वेळीच मुलाला दाखवा म्हणजे उपचार लगेच सुरु करता येतील. तिसरी लाट येईल का आणि आली तर लहान मुलांना किती संसर्गग्रस्त करेल याविषयी सध्या अंदाज आहेत पण आपण सावध राहिले पाहिजे. पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिक आणि दुसऱ्या लाटेत तरुणांना कोरोनाचा संसर्ग झाला. संसर्गाचं वय खाली आलंय. त्यामुळे तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. राज्यात माझे कुटुंब, माझी जबादारी मोहिमेची व्याप्ती वाढत चालली आहे, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 23, 2021, 4:01 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY