SSC Exam : मुख्यमंत्र्यांशी दोन दिवसांत बैठक, विद्यार्थ्यांचं आरोग्य ही आमची प्राथमिकता असेल : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
मुंबई :कोरोनाची दुसरी लाट आणि पाठोपाठ आलेल्या काळी बुरशी अर्थात ब्लॅक फंगस या साथींच्या पार्श्व भूमीवर यंदा बारावी बोर्डाच्या लेखी परीक्षा पूर्ण रद्द कराव्यात, यासाठी पालकवर्ग आणि शाळांकडून दबाव वाढला आहे. शिक्षणक्षेत्रातील नामवंतांनीही बारावी बोर्डाच्या लेखी परीक्षांसाठी केंद्रांवर बोलावून लाखो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालू नये, या मागणीची व्यवहार्यता आणि निकड पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोचवली आहे.
या पार्श्वभूमीवर राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव आणि संबंधित अधिकाऱ्यांबरोबर केंद्राची एक उच्चस्तरीय बैठक आज पार पडली. या ऑनलाइन बैठकीत माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल, महिला, बालविकास मंत्री स्मृती इराणी हे केंद्रीय मंत्रीही सहभागी झाल्या होत्या .
दरम्यान,राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या बैठकीत सहभाग घेतला होता.विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन परीक्षांसंदर्भात अंतिम निर्णय घेऊ . विद्यार्थ्यांचं आरोग्य ही आमची प्राथमिकता असेल आणि तिच प्राथमिकता लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी दोन दिवसांत बैठक घेणार असून चर्चा करून त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल , अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 23, 2021, 3:30 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY