ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशील कुमार अटकेत
नवी दिल्ली : अनेक दिवसांपासून फरार असलेला ऑलिंपिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार आणि त्याचा साथीदार अजयला दिल्ली पोलिसांनी दिल्लीतील मुंदका परिसरातून शनिवारी अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी फरार सुशील कुमारच्या अटकेसाठी लूकआऊट नोटीस व अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्याची माहिती देण्यासाठी एक लाख रुपयांचे तर त्याचा साथीदार अजय कुमारची माहिती देणाऱ्यास पन्नास हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
https://twitter.com/kaaltarangnews/status/1396368833405853697
काय आहे प्रकरण ?
मिळालेल्या माहितीनुसार, सागर दिल्ली पोलिसांतील हेड कॉन्स्टेबलचा मुलगा होता.. सागर आणि त्याचे मित्र ज्या घरात राहत होते, ते घर रिकामे करण्यासाठी सुशील कुमार दबाव टाकत होता. त्या वादातून हाणामारी झाली होती. दिल्लीतल्या स्टेडियमच्या आवारात ही घटना घडली होती. त्यानंतर सुशील कुमारचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला होता. त्यावेळी न्यायाधीशांनी नमूद केले की “आरोपींवरील आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. आतापर्यंतच्या तपासणीच्या नोंदीतून हे उघडकीस आले आहे की आरोपी (सुशील कुमार) हा मुख्य सूत्रधार होता.”
तर पोलिसांनी सांगितल्यानुसार, 5 मे रोजी छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगमध्ये सागर राणा या युवा पहिलवानावर सुशील कुमार आणि इतर दोघांनी हल्ला केल्याच्या आरोप आहे. पैलवानांच्या दोन गटात हाणामारी झाली होती. यात गोळीबारदेखील करण्यात आला होता. यात सागर (23), सोनू (37), अमित कुमार (27) आणि इतर 2 पैलवान जखमी झाले होते. जखमी झालेल्या सागरचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. युवा पहिलवान सागर राणा याच्या खुनाचा आरोप झाल्यापासून सुशील कुमार फरार होता. पंजाबात अटक केल्यानंतर या दोघांना मध्यरात्रीनंतर दिल्लीत आणले गेले
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 23, 2021, 1:05 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY