महाराष्ट्रात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले तर २६,१३३ नव्या रुग्णांची नोंद
मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेटही वाढत आहे. राज्यासाठी ही एक मोठी दिलासादायक बाब आहे. ही बाब जरी दिलासा देणारी असली तरी, अद्यापही नवीन करोनाबाधित संख्येत दररोज वाढ सुरूच आहे. काल दिवसभरात राज्यात ४० हजार २९४ रूग्ण करोनातून बरे झाले असून, २६ हजार १३३ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. तर, ६८२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.04% झाले आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण ५१,११,०९५ करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९२.०४ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.५७ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,२७,२३,३६१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५५,५३,२२५ (१६.९७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २७,५५,७२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २२,१०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३,५२,२४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 23, 2021, 12:01 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY