“या” जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन शिथिल !
कोल्हापूर : राज्यासह देशभरात कोरोनाच्या सऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू करण्यात आला असताना अनेक जिल्ह्यात मागील काही आठवड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने परिस्थिती चिंताजनक झाली होती. त्यामुळे अशा जिल्ह्यांमध्ये वा शहरांमध्ये पूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान ,कोल्हापूर जिल्ह्यातील लॉकडाऊन २३ मे रोजी रात्री १२ वाजल्यापासून शिथिल करण्याचे संकेत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून त्याबाबत हालचाली सुरु असून याबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडून लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल.
जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु आहे. यामध्ये रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई सुरु असून सर्व उद्योग, व्यवसाय बंद आहेत. दुध, औषधे, भाजीपाला वगळता सर्व व्यवहार ठप्प आहेत. घरातच थांबूत या लॉकडाऊनला जिल्हावासियांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. हे लॉकडाऊन आणखी आठ दिवस वाढणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र रविवारी रात्री १२ पासून लॉकडाऊन शिथिल करून ३१ मे पर्यंत राज्यशासनाच्या नियमांप्रमाणे (सकाळी ७ ते ११) सर्व व्यवहार सुरु राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 22, 2021, 9:33 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY