ज्येष्ठ संगीतकार राम लक्ष्मण’ फेम ‘लक्ष्मण’ कालवश; वयाच्या 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई : ‘मैंने प्यार किया’, ‘हम आपके हैं कौन’ आणि ‘हम साथ साथ हैं’सह 90 हून अधिक चित्रपटांना संगीतबद्ध करणारे संगीतकार राम लक्ष्मण फेम लक्ष्मण यांचे निधन झाले आहे. काल रात्री 1 वाजता त्यांनी नागपूर (Nagpur) मध्ये अखेरचा श्वास घेतला. ते 79 वर्षांचे होते. आज दुपारी 12 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. यांच्या निधनावर कलाविश्वातून हळहळ व्यक्त होत आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ट्विटच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहिली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी शोभा पाटील, मुलगा संगीतकार अमर पाटील, सूना, नातवंडे, दोन मुली असा आप्त परिवार आहे.
राम लक्ष्मण यांचं खरं नाव विजय पाटील असून ते मुळचे नागपूरचे होते. आपल्या संगीताने त्यांनी मराठीतच नाही तर हिंदी सिनेमांमध्येही गाणी दमदार केली. राम लक्ष्मण यांचे खरे नाव विजय काशीनाथ पाटील होते. त्यांनी त्यांचे थोरले बंधू सुरेंद्र पाटील यांच्यासह 1975 मध्ये म्युझिक इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. एका कार्यक्रमात दादा कोंडके यांनी विजय पाटील आणि सुरेंद्र पाटील यांना त्यांच्या चित्रपटाला संगीत देण्याची ऑफर दिली. दादा कोंडके यांनीच या दोघांना राम लक्ष्मण हे नाव दिले. सुरेंद्र पाटील यांना राम आणि विजय पाटील लक्ष्मण या नावाने ओळखले जाऊ लागले. नंतर राम लक्ष्मण यांना सूरज बडजात्या यांच्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाद्वारे मोठा ब्रेक मिळा होताला. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. कलेच्या जोरावर त्यांनी सिनेसृष्टीत घवघवते यश मिळवले.
राम लक्ष्मण या जोडीने तब्बल 92 चित्रपटांना संगीत दिले होते. मराठीत ‘पांडू हवलदार’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘राम राम गंगाराम’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’ यांसारखे सिनेमे तर ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’, ‘मैंने प्यार किया’, ‘तराना’ यांसारख्या हिंदी सिनेमांना त्यांनी संगीत दिले होते.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 22, 2021, 6:06 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY