Breaking News

संज्या राऊत WHOला सल्ले देतो आणि वांग्या पवार केंद्राला सल्ले देतो

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 22, 2021 5:52 pm
|

मुंबई – कोरोनाच्या या संकटकाळात देशाला सध्या लसीकरणाची सर्वाधिक जास्त गरज असल्यामुळे आरबीआयकडून मिळालेली ९९ हजार कोटींचे अतिरिक्त रक्कम त्यासाठी वापरावे असा सल्ला ट्विट करत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला दिला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्राचा पॅटर्न राबवण्याचा सल्ला देताना दिसतात. आणि यावरून माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विट करत रोहित पवार (Rohit Pawar) आणि संजय राऊतांवर (Sanjay Raut) टीका केली.

कोण रे बाबा तू सल्ला देणारा! या महाविकास आघाडीमध्ये सगळे नग भरले आहेत. संज्या राऊत डब्लूएचओला सल्ले देतो आणि वांग्या पवार केंद्राला सल्ले देतो. ह्या ठाकरे सरकारमध्ये नाक्यावरच्या रिकामटेकड्यासारखे सगळे नुसते सल्ले देत फिरतात, असं म्हणत निलेश राणे यांनी दोन्ही नेत्यांवर मिस्कील टीका केली आहे.

तर मंत्री वडेट्टीवार याच्यवर निशाणा साधत म्हटले की , मालवणात एका ग्रामस्थाने वादळानंतर पाणी नाही म्हणून रस्त्यावरती रिकामी घागरी ठेवली होती. त्या व्यक्तीची एवढीच इच्छा होती की मंत्री वडेट्टीवार यांनी उतरून त्याची विचारपूस करावी पण ठाकरे सरकारचे मंत्री इतके घाबरट आहेत की पोलिसांना पाठवून त्या व्यक्तीचं न ऐकताच मंत्री निघून गेला. असे म्हटले आहे, तर मुख्यमंत्र्याच्या कोकण दौऱ्यावर ६० ते ७० लाख रुपये खर्च झाले, खाजगी विमानाचा व इतर खर्च मिळून. फक्त ३ तासांसाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतःवर एवढे पैसे उडवले पण ज्या भागाची पाहणी करायला आले तिथे ७ रुपये सुद्धा दिले नाहीत. चिपी विमानतलाळा DGCA ची परवानगी नसताना स्वतःचं विमान उतरवलं. असं म्हणत मुख्यमंत्र्याच्या कोकण दौऱ्यावर निलेश राणे यांनी बोचरी टीका केली आहे.

रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात

रोहित पवार आपल्या या ट्विटमध्ये म्हणतात, देशाला आज लसीकरणाची सर्वाधिक गरज असून केंद्र सरकारने व्यापक लस निर्मिती आणि वितरण कार्यक्रम हाती घेऊन देशाला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढावे. त्यासाठी बजेटमध्ये केलेली ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद आणि रिझर्व बँकेकडून मिळालेले अतिरिक्त ९९ हजार कोटी रुपये या कार्यक्रमासाठी वापरता येतील.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 22, 2021, 5:52 pm
Tags:
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *