Breaking News

गडचिरोली: पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 13 नक्षलवाद्यांचा खात्मा

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 21, 2021 7:07 pm
|

गडचिरोली : शुक्रवारी पहाटे महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात चकमकीत 13 नक्षली ठार झाले आहेत. ताज्या माहितीनुसार या चकमकी दरम्यान पोलिसांनी 13 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. आतापर्यंत 6 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. ठार मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. गडचिरोलीचे डीआयजी संदीप पाटील यांनी याला दुजोरा दिला आहे. ही चकमक गडचिरोलीतील एटापल्लीच्या जंगलात पोलिसांच्या सी-60 युनिट आणि नक्षलवाद्यांमध्ये झाली. मात्र अद्याप नक्षलवाद्यांची ओळख पटलेली नाही. या परिसरात पोलिसांकडून अद्याप तपास केला जात आहे.

पहिला एनकाउंटर अशा वेळी झाला जेव्हा गडचिरोली पोलिसांच्या सी-60 कमांडो टीमकडू शनिवारी तपास करण्यास सुरुवात केली. विविध ठिकाणी लपलेल्या जवळजवळ 50-60 नक्षलवाद्यांसोबत जोरदार गोळीबार झाला. दोन्ही बाजूने जवळजवळ 1 तासांहून अधिक वेळ गोळीबार सुरु होता. त्यानंतर नक्षलवादी पाठी हटले आणि सकाळच्या वेळी जंगलात पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात तपास केला आणि तेथून 3 प्रेशर कूकर बॉम्ब, 303 रायफल मॅगजीन, जीवंत काडतूसे, विजेच्या तारा, फायर-क्रॅकर बॉम्ब, औषध आणि अन्य गोष्टी हस्तगत केल्या. दुसऱ्या चकमकीवेळी जेव्हा फायरिंगमध्ये सी-60 कमांडो कडून पाच नक्षल वाद्यांना मारण्यात आले त्यामध्ये दोन महिलांचा सुद्धा समावेश होता.

गत महिन्यात गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील गुट्टा पोलिस ठाण्यात नक्षलवाद्यांनी ग्रेनेड फेकला. स्फोट न झाल्याने दुर्घटना टळली होती. मात्र, नक्षलवाद्यांनी पोलीस स्टेशन उडवण्याचा प्रयत्न केल्याने ही मोठी घटना मानली जात होती. त्यानंतर सी-60 कमांडोने ही कारवाई केली आहे.

गडचिरोली जिल्ह्याची स्थापना झाल्यापासून संपूर्ण भागात नक्षलवादी कारवाया वाढल्या आहेत. यावर बंदी घालण्यासाठी तत्कालीन एसपी केपी रघुवंशी यांनी 1 डिसेंबर 1990 रोजी सी-60 ची स्थापना केली. त्यावेळी या सैन्यात केवळ 60 खास कमांडो भरती करण्यात आले होते, ज्यामुळे हे नाव पडले. नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी गडचिरोली जिल्हा दोन भागांत विभागला गेला. प्रथम उत्तर विभाग, द्वितीय दक्षिण विभाग. या कमांडोना विशेष प्रशिक्षण दिले जाते.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 21, 2021, 7:07 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *