राज्यात लॉकडाऊन अजून वाढणार, मुख्यमंत्री म्हणाले…
रत्नागिरी : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा थैमान घातले आहे. राज्यातील ठाकरे सरकारने १ जूनपर्यंत लॉकडाऊन((Lockdown) वाढवले आहे. यातच, १ जूनपर्यंत नंतर लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray )यांनी संकेत दिले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रत्नागिरीत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील काही भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत वाईट परिस्थिती आहे, यामुळे पुढील काही काळात आपण निर्बंध शिथील करु. सुरक्षेचे नियम पाळावेच लागतील,’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी वाढविणार का या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, की, ‘सध्या परिस्थिती आटोक्यात असून त्यानुसार नंतर निर्णय घेऊ, पण कोणीही कोरोना काळात गाफील राहू नये.’
तत्पूर्वी, राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी लॉकडाउनवर भाष्य केलं होतं. सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ठाकरे सरकारने १ जूनपर्यंत राज्यात कठोर निर्बंध लावले आहेत. आदित्य ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान राज्यातील लॉकडाऊन संदर्भात भूमिका स्पष्ट केली. दरम्यान , राज्यातील मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक शहरात नव्या कोरोनाबाधितांची संख्या काही अंशी घटताना दिसत आहे. मात्र तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या चिंता वाढवणारी गोष्ट आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 21, 2021, 3:57 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY