म्युकरमायकोसीस आजारावरील उपचारांसाठी केंद्राने महाराष्ट्राला झुकते माप द्यावे- राजेश टोपे
मुंबई – कोरोना व्हायरस प्रादुर्भाव राज्यात कायम असताना काळी बुरशी म्हणजेच म्युकरमायकोसीस (Mucormycosis) आजारही राज्यात डोके वर काढतं असून राज्य सरकारकडून त्याचा सामना करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या राज्यात म्युकरमायकोसिसचे ८०० ते ८५० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. या आजाराच्या रुग्णवाढीचा वेग पाहाता सध्या आपल्याला आत्ता २ लाख इंजेक्शन्सची गरज आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करत असून हा साठा ३१ मेनंतर उपलब्ध होणार असल्यामुळे महाराष्ट्रासाठी पुढचे १० दिवस महत्त्वाचे आणि काळजीचे असणार आहेत, अशा शब्दांत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच, यासाठी महाराष्ट्राला या इंजेक्शनच्या वाटपामध्ये केंद्र सरकारने झुकते माप द्यायला हवे, अशी देखील मागणी त्यांनी यावेळी केली.
राजेश टोपे म्हणाले , केंद्र सरकारच्या संबंधित विभागांशी मी स्वत: बोललो आहे. याचा कच्चा माल साराभाई कंपनीकडून घेऊन आपण वर्धा आणि पालघरमधील उत्पादकांना देऊन हे इंजेक्शन बनवून घेण्याची तयारी दाखवली आहे. त्यासाठी २ किलो कच्चा माल पुरवण्याचे त्यांनी मान्य केले आहे. २० हजार इंजेक्शन एका किलोमध्ये तयार होतात. त्या माध्यमातूनही इंजेक्शन मिळवण्याचा आपला प्रयत्न असल्याचे राजेश टोपे यावेळी म्हणाले. राज्य सरकारकडून म्युकरमायकोसिस आजाराचा सामना करण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांबाबतची माहिती ते प्रसारमाध्यमांना देत होते. ते म्हणाले,म्युकरमायकोसिसचे दररोज १०० रुग्ण आढळत आहेत. पुढे दर आठवड्याला ५०० च्या आसपास रुग्ण वाढणार आहेत. आपल्याला या क्षणाला दीड ते दोन लाख इंजेक्शन हवे आहेत. त्यासाठी १ लाख ९० हजार इंजेक्शन्सची ऑर्डर देखील आपण दिली आहे. आपणच तिचे पैसे देखील देणार आहोत. पण त्याचे वाटप कसे करायचे, हे केंद्राच्या हातात आहे. जशी रेमडेसिविरला एक स्थिरता आली आहे, तशी या बाबतीत ३१ मेनंतर इंजेक्शनची उपलब्धता होईल. त्यामुळे पुढील १० दिवस महाराष्ट्रासाठी अडचणीचे असल्यामुळे केंद्र सरकारने प्रयत्न करून हे इंजेक्शन पुरवावीत, अशी मागणी देखील यावेळी टोपे यांनी केली आहे.
म्युकरमायकोसीस आजारांबाबत राज्य सरकारची महत्त्वपूर्ण उपययोजना
मुक्यकरमायकोसीस रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार होतील.
कोणतंही रेशनकार्ड असणाऱ्या व्यक्तींना म्युकरमायकोसिसवरचे मोफत उपचार मिळणार.
कुठलंही रेशनकार्ड असले तरी महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये काळी बुरशी आजारावर मोफत उपचार
आजारांवरील उपचारांसाठी इएनटी, डेंटिस्ट, ऑप्थोमोलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट, प्लॅस्टिक सर्जन आवश्यक
काळी बुरशी आजार उपचारासाठी जो काही खर्च येईल तो राज्य सरकारने जाणीवपूर्वक उचलण्याची व्यवस्था केली आहे.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत प्रत्येकाच्या कुटुंबाला दीड लाख रुपयांचा कव्हर
म्युकरमाकोसीस आजाराच्या उपचारांसाठी राज्यातील रुगणालयांना मार्गदर्शक तत्वे जारी
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 19, 2021, 8:54 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY