संजय राऊत म्हणजे ‘सिक्रेट गेम्स’मधला तिवारी; मनसे
मुंबई: कोरोना संकटा पाठोपाठ महाराष्ट्रात आणखी एक संकट आले . तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांना मोठा फटका बसला . असून मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले.संकट काळात घरा बाहेर न पडणार्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मनसेने पत्रकार परिषदेत फैलावर घेतले .
पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात न येता गुजरातमधील नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेत आहेत. यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे अत्यंत सक्षम मुख्यमंत्री आहेत. ते कोणत्याही संकटाशी सामना करू शकतात, ही गोष्ट कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उमगली असेल. त्यामुळेच तौक्ते चक्रीवादळानंतर पंतप्रधान मोदी (PM Modi) महाराष्ट्रात न येता फक्त गुजरातच्या दौऱ्यावरच गेले असावे, अशी टीका राऊत यांनी केली.
यावरून मनसेने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना खडेबोल सुनावले आहे . मुख्यमंत्री उद्ध ठाकरेंनी मुंबईतील नुकसान झालेल्या भागाचा आढावा घेण्यासाठी तरी बाहेर पडावे अशा शब्दांत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे. संजय राऊत म्हणजे सेक्रेड गेम्स या वेबसिरीजमधील तिवारीच्या पात्राप्रमाणे आहेत. त्यांना ‘अहं ब्रह्मास्मि’चा भास होतो, ते त्याच थाटात वावरत असतात, असा टोला देखील संदीप देशपांडे यांनी लगावला आहे. तसेच मनसेनी बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत पंतप्रधान मोदींच्या गुजरात दौऱ्यावर खोचक टिप्पणी करणाऱ्या शिवसेनेचा समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांचे स्वत:च्या राज्यावर प्रेमही आहे. पण आमचे मुख्यमंत्री मुंबईत राहूनही घराबाहेर पडत नाहीत असेही देशपांडे (Sandeep Deshpande) म्हणाले .
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 19, 2021, 6:35 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY