कोरोना व्हायरसच्या प्रेताची विल्हेवाट; सृष्टीलाही धोका!
आज कोरोना व्हायरस आला व मृत्यूचं प्रमाण वाढलं. ते एवढं वाढलं की त्या प्रेतांची विल्हेवाट लावायला जागाच उरली नाही. स्मशानातही रांगा दिसायला लागल्या होत्या. त्याचबरोबर भांडणंही सुरु झाली होती. त्यातच एका राज्यसरकारनं या प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी अजब युक्ती योजली. ती म्हणजे प्रेताचे दफन करण्याऐवजी त्या प्रेतांना पाण्यात विसर्जीत करणे. त्यामुळं कोरोना व्हायरसच्या प्रेताच्या विल्हेवाटीने सजीवांना धोका होवू शकतो असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. त्याचे कारणही तसेच आहे.
विशेष सांगायचं म्हणजे प्रेतांची विल्हेवाट जर लावायची असली तर ती जाळून किंवा दफन करुन विल्हेवाट लावली जात असे. तर काही ठिकाणी प्रेते विहीरीवर ठेवून ती घारी गिधाडांना खावू घालण्याची प्रथा होती. तर काही ठिकाणी पाण्यातही टाकण्याची प्रथा होती. पाण्यात टाकण्याचा उद्देश होता मासोळ्या व जलचरांना अन्न देणं तसेच विहिरीवर प्रेत ठेवण्याचा उद्देश होता घारी गिधाडासारख्या इतर पशूपक्षांना अन्न देणं. ह्या दोन्ही प्रथा कोरोना येण्यापुर्वी ठीक होत्या.
वैज्ञानीक दृष्टिकोणातून विचार केल्यास एक गोष्ट नक्की सांगता येईल. ती म्हणजे सर्व सजीवांचा डी एन ए हा जवळपास मिळताजुळता असतो. बहुतःश सर्वच सजीवांचं रक्त हे लाल असतं. तसेच सर्वच सजीवांना रक्त, मांस व हाडे असतात. प्रत्येक सजीव श्वास घेतो, उत्सर्जन प्रक्रिया करतो तसेच प्रजनन प्रक्रियेत थोडासा फरक असला तरी प्रजननही करीत असतो. फक्त आकार, रुप, रंग वेगवेगळे असतात. अर्थात या तीनच बाबतीत फरक आहे. तसेच दुसरा आणि तोही फरक आंतरीक शरीररचनेत आहे. काहींना नऊ फुफ्फुसे असतात तर काहींना एकच. काही पक्षी असून पिल्लांना जन्म देतात. तसेच त्यांच्या वागण्यातही फरक आहे. वटवाघळं उलटे लटकतात. बाकी प्राणी सरळ बसतात. चातक केवळ पावसाचंच पाणी पितो. उंटांना सहा महिने पाणी प्यायला नाही मिळाले तरी चालते.
हा शुल्लकसा फरक जर सोडला आणि साम्याचा विचार केला तर सर्वच प्राण्यांचा डी एन ए जवळपास मिळता जुळता असल्यानं ही कोरोनाच्या आजारानं ग्रस्त असलेली व विहिरीवर खुल्या वातावरणात विल्हेवाटीसाठी ठेवलेली प्रेते खावून प्राण्यांनाही कोरोना होण्याचा संभाव्य धोका टाळता येत नाही. ही कोरोनाची प्रेते खावून घारी, गिधाडं, कावळे व ते मांस खाणारे इतर प्राणी कोरोनाग्रस्त होणार नाही कशावरुन? तसेच पाण्यात विल्हेवाटीसाठी टाकलेली प्रेते ही खावून पाण्यातील जलचर प्राणी कोरोनाग्रस्त होणार नाही का? नक्कीच होतील. याचाच अर्थ असा की या प्रेतांच्या विल्हेवाटीच्या पद्धतीनं सजीव सृष्टीलाही धोका निर्माण होवू शकतो. ही शक्यता नाकारता येत नाही.
उदाहरणार्थ सांगायचं झाल्यास ज्या ज्या पशूपक्षांनी व जलचरांनी किंवा सृष्टीतील घटकांनी हे कोरोनाग्रस्त प्रेतांचं मांस खाल्लं. ते ते घटक या कोरोनानं मरु शकतात. पुढे ते सृष्टीत पसरु शकतात व कोरोनाही तसाच पसरु शकतो. त्यातच आपण जे आज उपाय करीत आहोत ना कोरोना संपवायचा. तो कोरोना कधीच संपू शकणार नाही. हे असेच घडत राहिले तर………आज कोरोना पाहिजे तेवढा पसरलेला नाही. आपण आपली खबरदारी घेतोच आहे. त्यातच आपल्या संशोधकांनी अतिशय मेहनत घेवून काही औषधीही बाजारात आणल्या आहे. त्या सर्वांचा वापर करुन आपण कोरोनावर नक्कीच विजय मिळवू. हे निश्चीत आहे. मात्र प्रेतांची विल्हेवाट व्यवस्थीत पद्धतीनं लावण्याची गरज आहे. प्रेतांच्या विल्हेवाटीसाठी ही कोरोनाग्रस्त प्रेते जमीनीत खोलवर पुरणे हीच चांगली व योग्य पद्धत आहे. जाळणे, विहिरीवर ठेवणे वा पाण्यात विल्हेवाट लावण्यापेक्षा………आज कोरोनाग्रस्त ही प्रेते आपापल्या धर्मातील परंपरेनुसार विहिरीवर विल्हेवाटीसाठी ठेवल्यास हवेचे प्रदूषण तसेच पाण्यात विसर्जीत केल्यास पाण्याचं प्रदुषण होईल. तेच कोरोनाच्या विषाणूचं प्रदुषीत झालेली हवा आपल्या शरीरात श्वासावाटे गेल्यास आपल्या शरीराला कोरोना आजार अगदी शंभर टक्के होवू शकतो. कारण आपण जो मास्क लावतो ना. त्या मास्कपेक्षा कितीतरी मायक्रो सेमीचा हा कोरोना व्हायरस आहे. तो मास्कमधूनही सहजरित्या आपल्या श्वासाद्वारे शरीरात जावू शकतो. तसेच पाणी तर ही आपली मुख्य गरजच आहे. असे पाणी प्राशन केल्यास आपल्याला कोरोना होणार नाही कशावरुन? आपल्याला कोरोना नक्कीच होवू शकतो आणि आपल्या वागणुकीमुळं त्या सृष्टीतील निष्पाप सजीवांनाही.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 19, 2021, 12:16 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY