Breaking News

खळबळजनक! नदीपात्रात मासेमारी करणाऱ्या युवकाला जाळ्यात आढळले माशाऐवजी जिवंत बॉम्ब!

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 17, 2021 8:32 pm
|

सातारामधील कराड तालुक्यातील तांबवे गावानजीक असलेल्या कोयना नदीतील पुलाखाली जिवंत ग्रेनेड बॉम्ब सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कराड तालुक्यातील साकुर्डी फाटा येथून जवळच तांबवे पुलानजीक नदीपात्रामध्ये जिवंत ग्रॅनाईट (बॉम्ब) सापडले.घटनेची माहिती मिळताच कराड तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करण्याचे काम सुरू केले. पोलिसांनी प्राथमिक पाहणी केली असता ते ग्रेनेड बॉम्ब असल्याचे दिसून आले. त्यांनी वरिष्ठांना त्या संदर्भात माहिती दिली . त्यानतंर याबाबतची माहिती दहशतवादविरोधी पथकाला देण्यात आली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास दहशतवाद विरोधी पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाकडून ग्रेनड बॉम्बची तपासणी सुरू असून ते नदीपात्रात कोणी व कशासाठी टाकले याचा शोध घेतला जात आहे.

दरमयान, सोमवार दि. १७ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही बाब समोर आली. कराड तालुक्यातील साकुर्डी फाटा येथून जवळच असलेल्या तांबवे पुलानजीक नदीपात्रामध्ये सोमवारी सकाळी काही युवक मासेमारी करण्यासाठी गेले होते. मासे पकडण्यासाठी त्या युवकांनी नदीच्या पाण्यामध्ये गळ (जाळी) टाकल्यानंतर त्यांच्या गळाला मासा लागला असल्याचा अंदाज आल्याने त्यांनी तो गळ नदीच्या पात्रातून पाण्याबाहेर काढला. त्यावेळी त्यामध्ये ग्रॅनाईट (बॉम्बे) असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ते अतिशय अवजड असल्याने त्यांना त्याबाबत शंका आली. त्यांनी बॉम्ब प्लास्टिकच्या पिशवीत बांधून ठेवले. त्यानतंर मासेमारी करणाऱ्या युवकांनी याबाबत त्वरित पोलिसांशी संपर्क साधला. दरम्यान सापडलेले ग्रेनेड सैन्य दलाचे असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र त्याबाबत माहिती घेण्याचे कामही सुरू आहे. या वृत्ताला पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 17, 2021, 8:32 pm
Tags:
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *