तृणमूलच्या दोन मंत्र्यासहीत एका आमदाराला सीबीआयकडून अटक,मंत्र्यांच्या अटकेनंतर भडकले तृणमूल समर्थक, CRPF जवान आणि CBI ऑफिसवर दगडफेक
कोलकाता – बंगालच्या नारदा प्रकरणात पुन्हा एकदा केंद्रीय गुन्हे अन्वेषण(CBI) ने तपास सुरू केला आहे. सीबीआयने सोमवारी अनेक ठिकाणी छापेमारी केली. यानंतर ममता सरकारमधील मंत्री फिरहाद हाकिम, सुब्रत मुखर्जी, आमदार मदन मित्रा आणि माजी महापौर शोवन चॅटर्जी यांची चौकशी करुन सर्वांना अटक करण्यात आले. ४ मंत्र्यांना सीबीआयने अटक केल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या हजारो समर्थकांनी कोलकात्यातील सीबीआय ऑफिससमोर राडा घातला आहे. अनेकांनी दगडफेक केली आहे. राज्यपालांनी आता या प्रकरणात हस्तक्षेप करून ममता बॅनर्जींचे कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष वेधले आहे.
Invited attention of CM Mamata Banerjee–on channels and in the public domain, I notice arson & pelting of stones at the CBI office. Pathetic that Kolkata Police & West Bengal Police are just onlookers. Appeal to you to act and restore law and order: WB Governor Jagdeep Dhankhar pic.twitter.com/qhpXbYGmrV
— ANI (@ANI) May 17, 2021
सीबीआयने ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री फिरहाद हकीम यांच्या घरावर आधी छापे घातले. त्यांना ताब्यात घेतले. फिरहाद हकीम यांच्याशिवाय सीबीआयने सुब्रत मुखर्जी, तृणमूल कॉंग्रेसचे आमदार मदन मित्रा आणि माजी महापौर सोव्हान चटर्जी यांनाही अटक केली. यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः सीबीआय ऑफीस गाठून स्वतःलाच अटक करण्याची मागणी केली.
West Bengal: TMC Ministers Firhad Hakim, Subrata Mukherjee, MLA Madan Mitra & Former Mayor Sovhan Chatterjee were brought to the CBI office in connection with Narada Scam
— ANI (@ANI) May 17, 2021
ममता बॅनर्जी यांनी सीबीआय अधिकाऱ्यांशी जोरदार वाद घातला. राज्य सरकारच्या परवानगीशिवाय मंत्र्यांना अटक करताच कशी, अशी विचारणा ममता बॅनर्जी यांनी केली. परंतु, सीबीआयकडे नारदा घोटाळा प्रकरणात कारवाईची खुद्द राज्यपालांची परवानगी आहे. तसेच ममतांच्या चौघां मंत्र्यांविरोधात कारवाई करण्याचे कोलकाता हायकोर्टाचेही आदेश आहेत. ही माहिती सीबीआयचे प्रवक्ते आर. सी. जोशी यांनी दिली आहे.
या प्रकरणात आता राज्यपाल जगदीप धनकर यांनी हस्तक्षेप करून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष वेधले आहे. सीबीआय ऑफीससमोर दगडफेक झाली आहे. कोलकाता आणि पश्चिम बंगालच्या पोलीसांनी नुसती बघ्याची भूमिका घेतली आहे. कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, असे जगदीप धनकर यांनी स्पष्ट केले आहे.
#WATCH | TMC protesters pelted stones on security forces in West Bengal outside the CBI office. pic.twitter.com/GxGUZmIQxe
— ANI (@ANI) May 17, 2021
#WATCH | Security forces carried out baton charges against TMC protesters outside the CBI office in West Bengal. pic.twitter.com/yfdWmYLmB4
— ANI (@ANI) May 17, 2021
We’re moving to court. You know SC made a judgment during COVID-19 times that police can't unnecessarily detain, arrest any person. Despite that, CBI & police have arrested (our members): TMC MP over the arrest of 4 TMC leaders by CBI pic.twitter.com/pzyTrKJSyz
— ANI (@ANI) May 17, 2021
West Bengal Chief Minister Mamata Banerjee arrives at the CBI office pic.twitter.com/FM2B1zaeWL
— ANI (@ANI) May 17, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 17, 2021, 3:51 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY