मुंबईत मुसळधार पावसामुळे मस्जिद स्टेशन जवळ पाणी भरल्याने रेल्वे सेवा ठप्प
मुंबई: चक्रीवादळ तौक्ते आज मुंबईत दाखल झाले. हवामान विभागाने सांगितल्यानुसार, या वादळाने मुंबईत येताच आपले रौद्र रुप धारण केले आहे. यादरम्यान 185 किमी/तास वेगाने वारे वाहत असून, मुसळधार पाऊसदेखील सुरू आहे. या वादळामुळे मुंबईतील लसीकरण थांबवण्यात आले आहे. मुंबईतील विमानतळदेखील 11-2 बंद राहणार आहेत. याशिवाय, हाय टाइडमुळे मुंबईतील वरळी सी लिंक बंद करण्यात आले आहे.
हवामान खात्याने सकाळी 9 वाजता सूचना जारी करुन पुढील काही तास तौक्तेमुळे मुंबई, पालघर, रायगड, ठाणे व रत्नागिरी जिल्ह्यात मध्य ते तीव्र पावसाचा अंदा वर्तवला होता. शहरातील सर्व बीचवर मुंबई पोलिस आणि महापालिकेचे पाणबुडे पहारा देत आहेत. मुंबईत मुसळधार पावसामुळे CSMT- Vadala ही हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. मात्र वडाळा ते पनवेल आणि मेन लाईन, ट्रान्स हार्बर वरील सेवा मात्र सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Due to heavy downpour /rain and waterlogging near Masjid station, UP/DN Harbor line services between CSMT- Vadala have stopped from 1.20pm onwards. Trains are running on Mainline, Trans Harbor line, BSU(Uran) line and between Vadala- Panvel on Harbor line.
Will keep you updated.
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) May 17, 2021
मुंबईमध्ये NDRF च्या तीन पथकांना तैनात करण्यात आले असून, 5 टीम अलर्टवर आहेत. 5 ठिकाणी शेल्टर होम बनवण्यात आले आहेत. शहरातील दादर, वरळी, लोअर परेळ, माटुंगा आणि माहिमसह मुंबईतील पश्चिम भागात जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईतील वरळी सी फेस, शिवाजी पार्क, मरीन ड्राइववर उंच लाटा येत आहेत.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 17, 2021, 2:50 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY