Breaking News

ठाणे : तौत्के चक्रीवादळाशी सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 16, 2021 6:38 pm
|

ठाणे : भारतीय हवामान विभाग यांनी दिलेल्या सुचनेनुसार पूर्व मध्ये अरबी समुद्रात वादळसदृश्य स्थिती निर्माण होत आहे. या कालावधीत लक्षव्दीप, केरळ, तामिळनाडू व कर्नाटक समुद्र किनाऱ्यावर पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच काही ठिकाणी पर्जन्यमान झाले आहे . दि. १६/०५/२०२१ रोजी महाराष्ट्र- गोवा किनाऱ्यावर ४०-४५ ते ६० किमी प्रतीतास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने खालील बाबी बाबत विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेश नार्वेकर यांनी दिले.

सदर कालावधीत होणारा पाऊस, अतिवृष्टी, वाऱ्याचा वेग, वीज कोसळणे, झाडे कोसळणे, वाहतूक व्यवस्था ठप्प होणे, विद्युत पुरवठा विखंडीत होणे या बाबत योग्य ती उपाययोजना त्वरीत करणेबाबत दक्षता घेणेंत यावी.

IMD / राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचेकडील बुलेटीन मधून वेळोवेळी देण्यात आलेल्या सावधानतेच्या इशाऱ्याबाबतची माहिती DISASTER MGMT THANE या व्हॉट्सअॅप ग्रूपवर पाठविणेत येईल याची तत्काळ दखल घेवून योग्य ती उपाययोजना करण्यात यावी.

सहाय्यक आयुक्त, मत्सव्यवसाय ठाणे / पालघर यांनी मच्छीमार संघटनाद्वारे उत्तन व आसपासच्या मच्छिमारांना समुद्रामध्ये मासेमारीकरीता मज्जाव करणेत यावा व समुद्रात गेलेल्या बोटी तत्काळ नजीकच्या किना-याजवळ पोचणेबाबत संदेश देवून बोटी किनाराजवळ पोचल्याबाबत खात्री करावी.

सदर वादळाच्या अनुषंगाने प्रामुख्याने मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील उत्तन येथील या परिसरामध्ये आयुक्त, मिरा भाईंदर, अपर तहसिलदार मिरा भाईंदर यांनी उत्तन येथील समुद्र किना-यावरील घडामोडींवर विशेष लक्ष ठेऊन तातडीने उपाय योजना कराव्यात.

चक्रीवादळापासून निर्माण होण्याच्या धोक्यामुळे किनारपट्टी लगत व सखल भागात वास्तव्यास असणाऱ्या कच्च्या स्वरूपाच्या घरांमधील रहिवासी / नागरीकांना स्थलांतरीत करुन त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. ज्या ठिकाणी सदर नागरीकांना हलविण्यात येणार आहे अशी ठिकाणे (कोविड-१९ ची पार्श्वभूमी पाहता) निर्जंतुकीकरण करण्यात यावी. सदर स्थलांतरीत नागरीकांसाठी पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याची व आवश्यक खाद्यसामुग्रीची व्यवस्था करणेत यावी.

६. नजिकचे शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी रुग्णालये यांना सज्ज राहणेबाबत तसेच आवश्यक ते वैद्यकीय पथक व औषध पुरवठा उपलब्ध करुन ठेवणेबाबत सुचना देण्यात याव्यात.

७. धोकादायक इलेक्ट्रीक पोलचे सर्वेक्षण करुन आवश्यक ती दुरुस्ती करण्यात यावी. तसेच वादळामुळे रस्त्यालगत / वस्तीमध्ये तसेच विद्युतवाहीनी जवळील मोठया झाडांमुळे दुर्घटना होवू नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने सदर झाडांची छाटणी करणेत यावी.

८. नागरीकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक तेवढया रूग्णवाहिका (Ambulance) तैनात ठेवाव्यात.

९. पोलिस विभागाने पब्लिक अनाऊंसमेंट सिस्टमद्वारे चक्रीवादळाबाबत जनजागृती करावी. तसेच आवश्यक तेथे पोलिस बंदोबस्त तैनात करावा व नागरीकांना स्थलांतरीत करणेकामी आवश्यक ते सहकार्य करावे.

१०. कोविड १९ लक्षात घेता सुरक्षित निवाऱ्याची उपलब्धता, त्याचे निर्जंतुकीकरण, रुग्णालयाचा विद्युत पुरवठा, मनुष्यबळ व औषध पुरवठा, स्थानिक कार्यकारी यंत्रणा NDRF व SDRF पथके तैनात करतांना मास्क व पीपीई किट्स ची उपलब्धता, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे नियोजन करून तत्काळ कार्यवाही करण्यात यावी.

कोविड-१९ (कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव) चा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने स्थापन केलेल्या DCH व DCHC या रुग्णालयाच्या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. तसेच आवश्यकतेनुसार सदर ठिकाणी विद्युत जनरेटरची व्यवस्था करणेत यावी. DCH व DCHC येथील व्हेंटीलेटर व ऑक्सीजनचा पुरवठा अखंडीत सुरू राहील याबाबतची दक्षता घ्यावी.

सर्व महानगरपालिका आयुक्त/ मुख्याधिकारी नगरपालिका यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील सखल भागातील (low line area) ची ठिकाणांची संख्या, त्यांची नावे व सदर ठिकाणावरून स्थलांतरीत करावयाच्या व स्थलांतरीत केलेल्या नागरीकांची माहिती या कार्यालयाकडे सादर करावी.

उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करून सर्व यंत्रणा समवेत योग्य तो समन्वय साधावा. चक्रीवादळाच्या अनुषंगाने आपले स्तरावर पंचनामे करणेसाठी पथके स्थापन करावी.

सर्व यंत्रणानी त्यांचे आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष २४x७ सुरु ठेवावे व जिल्हा नियंत्रण कक्षाच्या कायम संपर्कात राहून प्रत्येक घटनांची माहिती ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षास दयावी.असे निर्देश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यातील अधिकारी वर्गाला दिले.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 16, 2021, 6:38 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *