सिद्धीविनायक रूग्णालयाने केले २२०० आदित्य बिर्ला ग्रुपच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण
ठाणे: ठाणे महापालिकेच्यावतीने खासगी कार्यालये, औद्योगिक आस्थापना व गृह संकुले यांच्यासाठी निश्चित केलेल्या लसीकरण धोरणांतर्गत महावगरपालिकेने ठाणे शहरातील जवळपास ८५ रूग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली असून त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. दरम्यान या धोरणातंर्गत पाहिलं खासगी आस्थापना लसीकरण केंद्र आदित्य बिर्ला ग्रुपने सुरु केले असून रोज ५०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण याप्रमाणे आतापर्यंत एकूण २२०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले आहे.
या लसीकरण केंद्रावर लस योग्यरित्या संग्रह करण्याची जबाबदारी बिर्ला ग्रुपची असून सिद्धिविनायक हॉस्पिटलने १ वैद्यकीय अधिकारी, ३ व्हॅक्सिनेटर आणि ६ इतर मेडिकल स्टाफ अशी १० जणांची नेमणूक या ठिकाणी केली आहे. लसीकरणासाठी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कोविन पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक असून सर्व कर्मचाऱ्यांची रीतसर नोंदणी करण्यात आली आहे. सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या माध्यमातून आता वागळे येथील आयआयएफएल या खासगी आस्थापनामध्ये देखील लसीकरण सुरू आहे.
दरम्यान ज्या आस्थापनांना लसीकरण केंद्र सुरू करावयाचे आहे त्यांनी खासगी लस पुरवठा धारकांकडून लस उपलब्ध करून लसीकरण केंद्र सुरु करण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले असून महापालिकेकडून फक्त लसीकरण केंद्राच्या तांत्रिक बाबीसंदर्भात महापालिकेच्यावतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. केंद्र-राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार ठाणे महानगरपालिकेच्या टास्क फोर्सच्या माध्यमातून ठाण्यात आतापर्यंत ८५ नवीन खासगी हॉस्पिटलना लसीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असून त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 16, 2021, 3:06 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY