tauktae cyclone : कोकण किनारपट्टीवर धडकले तौक्ते चक्रीवादळ; अतिमुसळधार पावसाचा अंदाज
सिंधुदुर्ग : अरबी समुद्रात मागील काही दिवसांपासून कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. आता या कमी दाबाच्या पट्ट्याचं रुपांतर चक्रीवादळात होतं आहे. याचा फटका गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीला बसत आहे. काल कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी पावसानं कहर केला आहे. तर बऱ्याच ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. अरबी समुद्रातील वादळामुळे किनारपट्टीवर येणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यानं कोकणातील एका रेल्वेवर झाड कोसळलं आहे. त्यामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली आहे.ब्रृहन्मुंबई महानगर पालिका तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमिवर अलर्टवर आहे. कोरनो रुग्णांना देखील किनारी भागापासून इतरत्र रुग्णालयात हालवण्यात आले आहे. मुंबईतून मोठ्या गतीने तौक्ते चक्रीवादळ जाण्याची शक्यता आहे.
Severe Weather Warnings for the region. Kindly visit https://t.co/JYmdPo98tJ for detailed forecast and warnings pic.twitter.com/9aawghnGsP
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 16, 2021
या पार्श्वभूमीवर राज्यातील किनारपट्टीकडील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादाळाचा तडाखा कोकण किनारपट्टीवरील रायगड (Raigad) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) या जिल्ह्यांना अधिक बसण्याचा संभव आहे. राजापूर तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे तर ,सागवे गावालगत समुद्राला मोठ्या प्रमाणावर उधाण आले आहे. वेधशाळेकडून पुढील 5 दिवसांसाठी विविध जिल्ह्यांमधील हवामानाचा अंदाज वर्तवला असून पावसाच्या तीव्रतेनुसार रेड (Red), ऑरेंज (Orange), येल्लो (Yellow) आणि ग्रीन (Green) अलर्ट जारी करण्यात आले आहेत.
राजापूर तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात ,सागवे गावालगत समुद्राला मोठ्या प्रमाणावर उधाण , वेधशाळेकडून राज्यातील किनारपट्टीकडील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा#CycloneTauktae #Ratnagiri pic.twitter.com/VFF7GPE1Mh
— Kaaltarang News Marathi (@kaaltarangnews) May 16, 2021
16 मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसासह रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसासह येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार असून येल्लो आणि ग्रीन अलर्ट जारी केला आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 16, 2021, 2:36 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY