राजीव सातव यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त,”या” राजकीय नेत्यांनी व्यक्त केला शोक
काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. मागील 23 दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू आहे. आज अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत असून अनेक प्रतिक्रया समोर येत आहेत.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक असलेल्या राजीव सातव यांच्या निधनाबद्दल सुरजेवाला यांनी दुःख व्यक्त केले आहे. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये मागील 23 दिवसांपासून उपचार सुरु होते. राजीव सातव यांना कोरोनाची लागत झाली होती. त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती. पण, 25 एप्रिलनंतर प्रकृती बिघडली. काही दिवसानंतर प्रकृतीत पुन्हा सुधारत असल्याची माहिती येऊ लागली. पण, अचानक प्रकृती पुन्हा खालवली. 23 दिवसांपासून राजीव सातव व्हेंटिलेटरवर होते. आज अखेर राजीव सातवांचा कोरोना व इतर आजारांसोबत त्यांची जगण्याशी झुंज अपयशी ठरली आहे.. सातवांच्या निधनाच्या बातमीने हिंगोलीकरांनाच मोठा धक्का बसला आहे. पंचायत समिती सदस्य ते खासदार असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी राजीव सातव यांच्यासाठी पूर्वनियोजन नसताना सभा घेतली होती. 2014 च्या मोदी लाटेतही राजीव सातव हे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला होता. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे 2019 ची लोकसभा निवडणूक ते लढले नाहीत. परंतु राज्यसभेत हुसेन दलवाई यांची जागा रिक्त होताच राहूल गांधी यांनी सातव यांची त्या जागी निवड करत त्यांना वरच्या सभागृहात पाठवले. संसदेत भाजपच्या विरोधात आक्रमकपणे बोलणाऱ्या काँग्रेसच्या यंग ब्रिगेडचे ते महत्त्वाचे वक्ते मानले जात होते. लोकसभेत खासदार म्हणून त्यांची कामगिरी चांगली आहे असे कॉंग्रेसचे वरिष्ठ व ज्येष्ठ नेते मानतात.
म्हणाले की,
राज्य सभा सांसद श्री राजीव सातव के असामयिक निधन से व्यथित हूं। युवा नेता के रूप में देश की राजनीति में उन्होंने विशिष्ट स्थान बनाया। उनके निधन से देश की, विशेषतः महाराष्ट्र के लोगों की आवाज को मुखरित करने वाला युवा स्वर संसद में अब सुनाई नहीं देगा। मेरी गहन शोक संवेदनाएं।
— President of India (@rashtrapatibhvn) May 16, 2021
I’m very sad at the loss of my friend Rajeev Satav. He was a leader with huge potential who embodied the ideals of the Congress.
It’s a big loss for us all. My condolences and love to his family. pic.twitter.com/mineA81UYJ
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 16, 2021
काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 16, 2021
खासदार राजीव सातव यांच्या अकाली निधनाने एक अभ्यासू युवा नेता आपल्यातून गेला. आपल्या सर्वांसाठीच हा मोठा धक्का आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 16, 2021
निशब्द !
आज एक ऐसा साथी खो दिया जिसने सार्वजनिक जीवन का पहला कदम युवा कांग्रेस में मेरे साथ रखा और आज तक साथ चले पर आज…
राजीव सातव की सादगी, बेबाक़ मुस्कराहट, ज़मीनी जुड़ाव, नेत्रत्व और पार्टी से निष्ठा और दोस्ती सदा याद आयेंगी।
अलविदा मेरे दोस्त !
जहाँ रहो, चमकते रहो !!! pic.twitter.com/5N94NggcHu
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) May 16, 2021
काँग्रेसचे युवा नेते,खासदार राजीव सातव यांच्या निधनानं महाराष्ट्रानं,देशानं एक अभ्यासू,कार्यकुशल,आश्वासक नेतृत्व गमावले आहे.त्यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी,कार्यकर्त्यांशी जवळिकीचे,मित्रत्वाचे,सोहार्दाचे संबंध होते.ते भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते.भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/1KKrvxDCtE
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 16, 2021
काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे.
तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
या कठीण प्रसंगी हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना प्राप्त होवो, ही प्रार्थना करतो!
ॐ शान्ति— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 16, 2021
खा. राजीव सातव यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक हानी आहे. युवक काँग्रेसपासून आम्ही एकत्र व जवळ होतो. राजीवजींच्या यशाचा मी साक्षीदार होतो. माझा लहान भाऊ, मित्र,सहकारी व काँग्रेसचे उमदे नेतृत्व कोरोनाने हिरावून नेले. श्रद्धांजली वाहण्याची वेळ येईल वाटले नव्हते. भावपूर्ण श्रद्धांजली pic.twitter.com/SOzhOmZZQ2
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 16, 2021
राजीव सातव तु हे काय केलेस? राष्ट्रीय राजकारणात तुझ्याकडून खुप अपेक्षा होत्या..तुझं हे असं जाणं भयंकर वेदनादायक आहे..
चार दिवसापूर्वीच विडिओ काॅलवर आपण निशब्द हाय हॅलो केले..लवकरच बाहेर येण्याची तुझी विजयी मुद्रा माझ्या डोळ्यासमोर आहे..
तुला श्रध्दांजली कोणत्या शब्दात वाहू? pic.twitter.com/dR0txA7JkS— Sanjay Raut (@rautsanjay61) May 16, 2021
निशब्द..
आज माझ्यासाठी, तमाम कॉंग्रेसच्या कार्यकर्ता साठी काळाचा दिवस.
माझा मित्र, माझा भाऊ राजीव सातव आज आमच्यात नाही.
.
भावपूर्ण श्रद्धांजलीकाय बोलाव काय लिहाव काही कळत नाही, ही हाणी कधीही न भरून निघणारी आहे.
अलविदा मेरे दोस्त ! pic.twitter.com/mYU8b0ASJn
— Nana Patole (@NANA_PATOLE) May 16, 2021
राज्यसभा सांसद एवं गुजरात कांग्रेस प्रभारी श्री राजीव सातव के असामयिक निधन का समाचार बेहद दुखद है। श्री सातव विधायक रहे, भारतीय युवा कांग्रेस एवम महाराष्ट्र युवा कांग्रेस के अध्यक्ष रहे। पार्टी के लिए उनकी सेवाएं याद की जाती रहेंगी और उनकी कमी हमेशा खलेगी।
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) May 16, 2021
निःशब्द! दुःखदायक!! वेदनादायक!!!
काँग्रेसचे नेते, खासदार राजीव सातव जी यांच कोरोनाने निधन झाल्याने अत्यंत दुःख झालं…
देशाचं एक युवा नेतृत्व काळाने आपल्यातून हिरावून नेलं…
सातव परिवारावर कोसळलेल्या या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत!
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🌸 pic.twitter.com/smRpFKFpjQ— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) May 16, 2021
जमिनीशी घट्ट नाते जोडलेले युवा नेतृत्व म्हणून अत्यंत कमी वेळेत आपली स्वतंत्र यशोगाथा निर्माण केलेले माझे मित्र खा. राजीव सातव यांच्या अकाली निधनाने व्यथित झालो आहे. एक तडफदार युवा नेतृत्व आणि एक परममित्र गमावल्याचे दुःख कायम मनात राहील. भावपूर्ण श्रद्धांजली. (1/2)#RajeevSatav pic.twitter.com/NRs7djd2Lv
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) May 16, 2021
युवा नेते आणि खासदार राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतीव दुःख झाले. राजीवजी यांनी अतिशय कमी वयात देशाच्या राजकारणावर पाडलेली छाप कौतुकास्पद होती. त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) May 16, 2021
एक तारा निखळला,एक दिवा विझला!
काँग्रेसचे तत्त्व सार्वजनिक जीवनात रुजवणारे,असमान्य,संवेदनशील,विवेकी,मितभाषी,माझे बंधूवत मार्गदर्शक व आदर्श;खासदार मा.राजीव सातव जी यांचे अकाली निधन मनाला चरे पाडणारे आहे.तुम्हाला निरोप देण्याची वेळ माझ्यावर यावी,हे माझं दुर्दैव!भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/Agd8KnxH4T— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) May 16, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 16, 2021, 2:04 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY