कॉंग्रेसच्या आदर्शांना मूर्त रूप देणारा नेता हरपला; हे आपल्या सर्वांचे एक मोठे नुकसान : राहुल गांधी भावूक
मुंबई: काँग्रेस कमिटीचे सदस्य आणि राज्यसभा सदस्य ॲड. राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाले. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये मागील 23 दिवसांपासून उपचार सुरु होते. राजीव सातव यांना कोरोनाची लागत झाली होती. त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती. पण, 25 एप्रिलनंतर प्रकृती बिघडली. काही दिवसानंतर प्रकृतीत पुन्हा सुधारत असल्याची माहिती येऊ लागली. पण, अचानक प्रकृती पुन्हा खालवली. 23 दिवसांपासून राजीव सातव व्हेंटिलेटरवर होते. आज अखेर राजीव सातवांचा कोरोना व इतर आजारांसोबत त्यांची जगण्याशी झुंज अपयशी ठरली आहे.सातव (Rajiv Satav) यांच्या निधनानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘माझा मित्र राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त ऐकल्याने मला फार वाईट वाटलं. ते कॉंग्रेसच्या आदर्शांना मूर्त रूप देणारे नेते होते. हे आपल्या सर्वांचे एक मोठे नुकसान आहे. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या सदिच्छा.’
I’m very sad at the loss of my friend Rajeev Satav. He was a leader with huge potential who embodied the ideals of the Congress.
It’s a big loss for us all. My condolences and love to his family. pic.twitter.com/mineA81UYJ
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 16, 2021
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी रुग्णालयातील डॉक्टरांना फोन करत सातव यांच्या प्रकृतीसंबंधी विचारपूस केली होती. राहुल गांधी आणि डॉक्टरांमध्ये बराच वेळ चर्चा सुरु होती. त्यानंतर मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी जहांगीर रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी राजीव सातव यांच्यासाठी पूर्वनियोजन नसताना सभा घेतली होती. 2014 च्या मोदी लाटेतही राजीव सातव हे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला होता. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे 2019 ची लोकसभा निवडणूक ते लढले नाहीत. परंतु राज्यसभेत हुसेन दलवाई यांची जागा रिक्त होताच राहूल गांधी यांनी सातव यांची त्या जागी निवड करत त्यांना वरच्या सभागृहात पाठवले. संसदेत भाजपच्या विरोधात आक्रमकपणे बोलणाऱ्या काँग्रेसच्या यंग ब्रिगेडचे ते महत्त्वाचे वक्ते मानले जात होते. लोकसभेत खासदार म्हणून त्यांची कामगिरी चांगली आहे असे कॉंग्रेसचे वरिष्ठ व ज्येष्ठ नेते मानतात. सातवांच्या निधनाच्या बातमीने हिंगोलीकरांनाच मोठा धक्का बसला आहे. पंचायत समिती सदस्य ते खासदार असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 16, 2021, 11:48 am- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY