Breaking News

‘कोरोना’ची संभाव्य लाट विचारात घेऊन आरोग्य सुविधा उभारणीवर भर द्या

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 15, 2021 8:30 pm
|

बारामती, : बारामती तालुक्यामध्ये कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका लक्षात घेऊन योग्य नियोजन करावे, तालुक्यातील ‘कोरोना’ची साखळी तोडण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘कोरोना’च्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालके बाधित झाल्यास त्यांना आवश्यक ते उपचार वेळेत उपलब्ध करुन देण्यासाठी तालुक्यातील आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेवून लहान मुलांवरील उपचाराबाबत मार्गदर्शन, प्रतिबंधात्मक औषधे, आवश्यक साधन सामग्री व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याबाबत तयारी करावी. शासकीय व खासगी रुग्णालयांनी देखील रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र खाटा राखीव ठेवण्याबाबत कार्यवाही करावी. तसेच कोरोना बाधित झालेल्या लहान मुलांच्या पालकांची देखील राहण्याची सोय करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्री.पवार पुढे म्हणाले ‘म्युकरमायकोसिस’ रोगाचा प्रादुर्भाव कोरोना रूग्णांमध्ये वाढत आहे. या रोगासाठीच्या औषधांचा व लहान मुलांवर करावे लागणाऱ्या उपचारासाठीच्या औषधांची तसेच उपचाराकरीता लागणाऱ्या इतर काही साधनसामुग्रीची कमतरता पडू दिली जाणार नाही.कोरोना प्रतिबंधाच्यादृष्टीने 45 वर्षांवरील नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहे. परंतू सध्या मर्यादित स्वरुपात लस उपलब्ध होत आहे. त्यामुळे लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरण करण्यात यावे. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्यावर 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी स्पष्ट केले.

उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तालुक्यामधील शहर व ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना तसेच ऑक्सिजन, रेमडेसीवरचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. या आढावा बैठकीपूर्वी बारामती चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रिज मार्फत बारामती महिला रूग्णालयाला 2 टन क्षमतेचे 3 एअर कंडिशनर व मेडीकल कॉलेज कोविड सेंटरला फेस शिल्ड, सर्जिकल हेड कॅप, सर्जिकल शू कव्हर, सर्जिकल मास्क, हॅण्ड ग्लोज, डिसपोजेबल ॲप्रन, हॅण्ड वॉश, पल्स ऑक्सिमीटर, थर्मल गन, वॉटर कूलर, ऑक्सिजन ट्रॉली आदी साहित्य व वेंचर स्टीलचे रमाकांत पाडोळे यांच्याकडून 25 हजार रूपयांचा धानादेश देखील उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना सूपूर्द करण्यात आले.

नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे मंडळ अतुल चव्हाण, सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता विश्वास ओव्हाळ, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग पुणे धोडपकर, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, माजी जिल्हा परिषद आरोग्य आणि बांधकाम सभापती संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट नेता सचिन सातव आदींसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 15, 2021, 8:30 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *