राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय: परराज्यातील माल वाहतुकदारांची ‘आरोग्य सेतू’ द्वारे शहानिशा केल्यावरच राज्यात प्रवेश
मुंबई : परराज्यातील माल वाहतुकदारांच्या शरीराचे तापमान व इतर लक्षणे तसेच ‘आरोग्य सेतू’ मध्ये त्यांच्या स्थितीची शहानिशा केल्यावरच त्यांना राज्यात प्रवेश देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच जर यापैकी एकाही व्यक्तिला लक्षणे असतील किंवा ताप असेल किंवा ‘आरोग्य सेतू’ मधील त्यांची स्थिती ‘सुरक्षित नाही (नॉट सेफ)’ अशी असेल तर त्या सर्वांना जवळच्या कोविड केअर सेंटर मध्ये पुढील तपासणीसाठी दाखल करण्यात येईल.’ हे आदेश दि. 12 मे रोजीच्या आदेशाप्रमाणे दि. 1 जून 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहतील.असे महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने काढलेल्या सुधारीत आदेशात म्हटले आहे.
‘मालवाहतूक करणाऱ्यांसाठी साधारणत: दोन पेक्षा जास्त लोक (एक चालक+ क्लीनर किंवा मदतनीस) किंवा विशेष स्थितीत, लांब पल्ल्याच्या प्रवास किंवा आपत्कालीन स्थितीत मालवाहतूक करणाऱ्यांसाठी तीन व्यक्ती (दोन चालक+ क्लीनर/ मदतनीस) यांना प्रवास करण्याची परवानगी असेल. या व्यक्तिरिक्त अन्य व्यक्तीस मनाई असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे 15 मेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. अशातच राज्यात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून आला. आता राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. राज्यात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत निर्बंध लागू असणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक राज्य सरकारनं जारी केलं
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 15, 2021, 8:06 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY