Breaking News

कोरोनाच्या संपूर्ण संकटसमयी फडणवीस आणि माझ्याइतकं काम कोणत्याच नेत्याने केलं नाही’

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 15, 2021 4:22 pm
|

पुणे : कोरोनाच्या संपूर्ण संकटसमयी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि माझ्याइतकं काम राज्यातील इतर कोणत्याच नेत्याने केल्याचं दिसलं नाही. आम्ही कोरोनाच्या काळात सतत राज्यभर फिरत आहोत. आमच्या दोघांइतकं कोणताच नेता फिरला नसेल.असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. ते म्हणाले खर तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आधीच पीपीई किट घालून बाहेर पडायला हवं होतं, अशी मिस्कील टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीआज पत्रकारांशी संवाद सधला त्यावेळी ते बोलत होते.

पुण्यात प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी लसीकरणाचे ग्लोबल टेंडर, मराठा आरक्षण आणि राज्यातील कोरोना परिस्थिती अशा विविध विषयांवर भाष्य केले. केंद्र सरकारने परदेशी लसींना अद्यापही परवानगी न दिल्याने महाराष्ट्र सरकारची लस खरेदी रखडल्याचे अजित पवार यांनी माध्यमांना सांगितलं. पण मुळात लसींना परवानगी नसताना त्यांनी ग्लोबल टेंडर हा शब्द वापरलाच कसा?, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. तसेच मुंबई महानगरपालिकेप्रमाणे पुणे पालिकेला ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून लस खरेदीसाठी परवानगी दिली जात नसल्याच्या भाजप नेत्यांच्या आरोपात तथ्य असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

तसेच त्यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उपरोधिक टोला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची भेट घेतली. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री या निमित्ताने का होईना बैठका, भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी खरंतर मराठा आरक्षण, कोविड संकट यांच्याबाबतीत त्यांनी डबल मास्क, पीपीई किट घालून एक ते दीड वर्षांपूर्वीच या गोष्टी करायला हव्या होत्या. मात्र, आता का होईना ते भेटी गाठी घेत आहेत ही त्यातल्या त्यात चांगली बाब म्हणावी लागेल अशा शब्दात पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना उपरोधिकपणे टोला लगावला आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 15, 2021, 4:22 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *