मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या लहान भावाचे कोरोनामुळे निधन
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे छोटे भाऊ असीम बॅनर्जी यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्यांच्यावर कोलकाता येथील मेडिका सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आज त्यांनी याच रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, असीम यांच्यावर कोरोना प्रोटोकॉल अंतर्गत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, कोलकाता येथील मेडिका सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलचे अध्यक्ष आलोक रॉय यांनी त्यांच्या निधनाची माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भावाला कोरोना विषाणूची लागण झाली होती आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी सकाळी असीम यांनी अखेरचा श्वास घेतला.
West Bengal Chief Minister Mamata Banerjee's younger brother Ashim Banerjee passed away today at the hospital. He had tested positive for #COVID19 and was undergoing treatment: Dr Alok Roy, Chairman, Medica Superspecialty Hospital, Kolkata
— ANI (@ANI) May 15, 2021
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.16 मे ते 31 मे या कालावधीत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मते, राज्यात कोरोना विषाणूची एकूण 1,31,792 सक्रिय प्रकरणे आहेत. आतापर्यंत, कोरोनामुळे 12,993 लोक मरण पावले आहेत आणि जवळपास 950017 लोक बरे झाले आहेत.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 15, 2021, 2:56 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY