भारतात कोरोनाची परिस्थिती आणखी भयंकर होण्याची शक्यता; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
नवी दिल्ली – जगभरात गेल्या वर्षभर कोरोना महामारीने थैमान घातल्यानंतर आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारतासारख्या काही देशांना जबरदस्त तडाखा बसला आहे. कोरोनावर संशोधित झालेल्या प्रतिबंधक लसींमुळे संपूर्ण जगाने कोरोनाशी दोन हात करण्याची तयारी सुरू केली आहे.
पण जागतिक आरोग्य संघटनेने या सगळ्या पार्श्वभूमीवर वेगळाच इशारा दिला आहे. कोरोनामे आत्तापर्यंत जगभरात ३३ लाखाहून जास्त नागरिकांचे जीव घेतले आहेत. पण हे दुसरे वर्ष पहिल्या वर्षापेक्षा अधिक भयावह असेल. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि लसीकरण या दोन्हींच्या एकत्रित मदतीनेच आपण यातून बाहेर पडू शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. टेड्रॉस यांनी दिला आहे.
दरम्यान, भारतातील परिस्थिती चिंतेचा विषय असल्याची भूमिका यावेळी डॉ. टेड्रॉस यांनी मांडली.लसीचा पुरवठा हे या काळामध्ये एक सर्वात महत्त्वाचे आव्हान आहे. त्यासोबतच इतरही काही देशांमधील परिस्थितीवर भाष्य केले. भारतातील परिस्थिती अजूनही चिंतेचा विषय आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मृतांचे आकडे वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने भारताला मदतीचा हात दिला असून आत्तापर्यंत १ हजार ऑक्सिजन सिलेंडर, तात्पुरत्या आरोग्य सेवांसाठी टेंट, मास्क आणि इतर वैद्यकीय गरजेच्या वस्तू पुरवल्या जात आहेत, असे टेड्रॉस म्हणाले.
पण, भारत हा तातडीने मदतीची गरज असलेला एकमेव देश नाही. नेपाळ, श्रीलंका, व्हिएतनाम, कंबोडिया, थायलंड आणि इजिप्तमध्ये देखील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ नोंदवण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटना या सगळ्यांना शक्य ती सर्व मदत देईल, असे टेड्रॉस यांनी यावेळी सांगितले.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 15, 2021, 2:37 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY