कोरोनामुक्त झालेले राजीव सातव पुन्हा व्हेंटीलेटरवर, 24 तास डॉक्टरांच्या निगराणीखाली
पुणे : पाच दिवसांपूर्वीच काँग्रेस खासदार आणि गुजरातचे प्रभारी राजीव सातव यांनी कोरोनावर मात केली होती. पण, त्यांची प्रकृती आज पुन्हा एकदा खालावली असून त्यांना न्युमोनियाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना शनिवारी ता. १५ पहाटे पासून व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. पुण्यातच जहाँगिर हाॅस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असून तज्ञ डॉक्टरांचे पथक २४ तास त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन असल्याचे सुत्रांनी सांगितले.त्यामुळे काँग्रेसच्या गटातून चिंता व्यक्त केली जात आहे.
एप्रिल महिन्यात खासदार राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अखेर उपचाराअंती 10 मे रोजी त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे लवकरच राजीव सातव यांना रुग्ण्यालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती. पण, आता अचानक राजीव सातव यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना न्युमोनियाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात येण्याची शक्यता असल्चाचे वृत्त एबीपी माझा वृत्तवाहिनीने दिले आहे. राजीव सातव यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त हाती आल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली आहे. राजीव सातव यांच्यावर जहांगीर हॉस्पिटलमध्ये गेल्या 22 दिवसांपासून उपचार सुरू आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 15, 2021, 2:27 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY