VIDEO: ‘लव्ह यू जिंदगी’ गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीची कोरोनापुढे हार , सोशल मीडियात हळहळ व्यक्त
नवी दिल्ली:, देशात कोरोना महामारीचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढतच आहे. देशात दररोज लाखो कोरोना रुग्ण (Corona cases in india) आढळत असून त्याचे मृत्यू (Corona patients death) होतं आहे. तर रुग्णालयात असंख्य कोरोनाबाधित रुग्ण मृत्यूशी लढा देत आहेत. अशा एकंदरित नैराश्यपूर्ण वातावरणात जगण्याची उमेद दाखवणारा एक सकारात्मक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलझाला होता. संबंधित व्हिडिओमध्ये एक 30 वर्षीय युवती ऑक्सिजन मास्क लावून मृत्यूशी झगडत असताना ‘लव्ह यू जिंदगी’या गाण्यावर थिरकत होती.
तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता. तर अनेकांनी तिच्या सकारत्मकतेचं भरभरून कौतुक केलं होतं. डॉक्टरांनी म्हटले की , मुलीची जगण्याची इच्छाशक्ती दाड्गी होती . रुग्णालयात उपचार घेत असताना एक गाणं लावण्याची तीन परवानगी मागितली. यानंतर मी तिला परवागनी दिली.तरुणीच्या प्रकृतीत सुधारणा होतं आहेत. लवकरच तिला डिस्चार्ज देण्यात येणारहोता परतु अचानक तब्बेत बिघडल्याने तिने . दिल्लीतील एका रुग्णालयात संबंधित कोरोनाबाधित तरुणीनं अखेरचा श्वास घेतला आहे.डॉ. मोनिका लंगेह यांनी आज पुन्हा एकदा या मुलीसंदर्भातील ट्विट करत, माफी मागितली आहे. आपण, या ब्रेव्ह गर्लला वाचवू शकलो नाहीत. तिच्या कुटुंबीयांना आणि लहान मुलांना हे दु:ख पचविण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थनाही डॉ. मोनिका यांनी केली आहे. 13 मे रोजी रात्री 9.30 वाजता या मुलीचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. आयुष्यावर इतकं प्रेम करणाऱ्या तरुणीची कोरोनापुढे हार झाल्यानंसोशल मीडिया हळहळला आहे. अनेकांना दु:ख व्यक्त केलंय.
She is just 30yrs old & She didn't get icu bed we managing her in the Covid emergency since last 10days.She is on NIVsupport,received remedesvir,plasmatherapy etc.She is a strong girl with strong will power asked me to play some music & I allowed her.
Lesson:"Never lose the Hope" pic.twitter.com/A3rMU7BjnG— Dr.Monika Langeh (@drmonika_langeh) May 8, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 14, 2021, 3:21 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY