‘अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर विठू-रखुमाई आणि दगडूशेठ हलवाई गणपती’च्या दरबारात दरवळला आंब्याच्या सुगंध!
आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजल्या जाणार्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदिरामध्ये आंब्यांचा महाप्रसाद चढवण्यात आला आहे. अक्षय्य तृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिर सजलं आहे , आज मंदिरात श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे मंदिरात ११११ आंब्यांची आरास करण्यात आली. असून नंतर हे आंबे प्रसाद म्हणून ससून येथील रुग्णांना वाटण्यात येणार आहे.देसाई बंधू आंबेवालेचे मंदार देसाई यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे आंबे देऊन श्री चरणी सेवा अर्पण केली.
दरम्यान, हिंदू धर्मीयांसाठी खास असलेला आणि साडेतीन मुहुर्तांपैकी एक अक्षय्य तृतीयेचा (Akshaya Tritiya) सण. यंदा 14 मे दिवशी आहे. वैशाख शुक्ल तृतीयेला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. सध्या भारतामध्ये कोरोना संकट अजूनही घोंघावत असल्याने आपण बाहेर पडून पूर्वीप्रमाणे जल्लोषात आनंद साजरा करू शकत नसलो तरीही या दिवसाची गोडी आपण घरीच सुरक्षित राहून आणि व्हर्च्युअल माध्यमातून अक्षय्य तृतीया साजरी करून नक्कीच वाढवू शकतो.
भारतामध्ये दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सणामधूनही ही वृत्ती जोपासण्यासाठी आजचा अक्षय्य तृतीयेचा दिवस विशेष आहे. मान्यतांनुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दान केल्याने ते अक्षय आणि पुण्यकारक होते. आज कोविड 19 मुळे वातावरणामध्ये पसरलेली नकारात्मकता कमी करण्यासाठी अनेक गरजवंतांना आज लहान-सहान मदतीची गरज आहे.
तर पंढरपूरामध्येही विठ्ठल-रखुमाई मंदिरामध्ये आंब्यांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
https://twitter.com/Kr_Mulik/status/1393027482090045441
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 14, 2021, 2:26 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY