कोरोनामुळे यूपीएससी प्रिलिम्सच्या परीक्षा पुढे ढकलल्या, आता “या” दिवशी घेण्यात येणार परीक्षा
नवी दिल्ली: देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. देशभरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे, यासोबतच मृत्यूचे प्रमाणही मोठे आहे. यामुळे देशभरातील अनेक राज्यांमध्ये कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे. यामुळे अनेक परीक्षा या पुढे ढकलण्यात आला. आता यासोबतच UPSC नेही महत्त्वाचा निर्णय घेत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. UPSC 2021 ची प्रिलिमनिरी परीक्षा आता 10 ऑक्टोबर घेतली जाईल.
UPSC ही परीक्षा 27 जून रोजी होणार होती. यासाठी 4 मार्च 2021 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती, परंतु कोविडच्या दुसर्या लाटेमुळे देशातील परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक गंभीर आहे, म्हणून आयोगाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाची परिस्थिती पाहता परीक्षार्थी उमेदवारांकडून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत होती.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 13, 2021, 3:12 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY