महाराष्ट्रात लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवला; ठाकरे सरकारकडून निर्बंध जाहीर
मुंबई– देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून कोरोनामुळे मृत्यु होणाऱ्यांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट अत्यंत घातक असून आता कोरोनाबाधितांवर म्युकोरमायकोसिस या आजाराची टांगती तलवार निर्माण झाली आहे.राज्यातील करोनाचा उद्रेक रोखण्यासाठी राज्यात १४ एप्रिलपासून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आधी हे निर्बंध १ मेपर्यंत होते व नंतर १५ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत शनिवारी संपत असल्याने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. या निर्बंधामुळे राज्यात करोनाची साथ नियंत्रणात आली असून राज्याचा रुग्णवाढीचा दर कमी झाला आहे. १० ते १५ जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा कमी झाला असला तरी आजूनही काही जिल्हयात बाधितांची संख्या अधिक आहे. त्यामुळे त्यामुळे ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवत असल्याचा अधिकृत आदेश प्रसिद्ध करत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत.
सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानुसार हे नियम असतील…
किराणा दुकाने- सकाळी 7 ते 11
दुध संकलन आणि वितरणाला परवानगी
एअरपोर्ट आणि बंदरावर काम करणाऱ्याना लोकलने प्रवास करण्याची परवानगी
इतर राज्यातून येणाऱ्यांना 48 तास आधीचा RTPCR रिपोर्ट बंधनकारक
बाजारपेठामध्ये गर्दी वाढल्यास स्थानिक प्रशासनाकडे निर्णय घेणार
दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री- सकाळी 7 ते 11
भाजीपाला विक्री- सकाळी 7 ते 11
कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने- सकाळी 7 ते 11
पशुखाद्य विक्री- सकाळी 7 ते 11
बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने -सकाळी 7 ते 11
पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने- सकाळी 7 ते 11
फळे विक्री- सकाळी 7 ते 11
अंडी,मटण, चिकन,मासे विक्री- सकाळी 7 ते 11
येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने-सकाळी 7 ते 11
🚨Strict restrictions under #BreakTheChain extended till 1st June 2021🚨 pic.twitter.com/QxEmW77ZlV
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 13, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 13, 2021, 12:35 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY