Breaking News

आता आपल्याला शांत झोप लागणार आहे: प्रिया बापट

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 11, 2021 8:54 pm
|

मुंबई: मनोरंजन विश्वातील फेमस जोडी प्रिया बापट आणि उमेश कामत यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांनी याविषयीची माहिती चाहत्यांना दिली होती. दोघांची कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आल्यानंतर दोघं घरातच क्वारंटाईन झाले होते. त्यांच्यावर उपचारही सुरु होते. या दरम्यान ते त्यांच्या चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे संपर्कात होते.

त्यानंतर पोस्ट करत त्यांनी कोरोनामुक्त झाल्याची गुडन्यूज देखील दिली होती. आता पुन्हा एकदा प्रिया बापटची पोस्ट चर्चेत आली आहे. नुकतेच अभिनेत्री प्रिया बापटने तिच्या आयुष्यात मोठ्या धाडसाने एक काम केले आहे. आजपर्यंत तिने रक्तदान केले नव्हते. सुईची भीती वाटते म्हणून कधीच रक्तदान करण्याची हिंमत होत नव्हती. मात्र पहिल्यांदाच मनात कोणतीही भीती न ठेवता रक्तदान केल्याचा आनंद तिने चाहत्यांसह शेअर केला आहे. रक्तदान केल्यानंतर तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त करत एक वेगळेच समाधान मिळाल्याचे सांगितले आहे.

आज पहिल्यांदा रक्तदान केल्यानंतर किमान एक जीव वाचवण्यासाठी मी जे काही करू शकते ते केलं, आता आपल्याला शांत झोप लागणार आहे. रक्तदान हे महादान आहे त्यामुळे प्रिया बापटची ही पोस्ट पाहून इतरांनाही प्रेरणा मिळणार आहे


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 11, 2021, 8:54 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *