‘मुलगी झाली हो’ मालिकेतील कलाकार ‘शौनक जहागीरदार’ ला एक्सप्रेस हायवेवर भरदिवसा लुटले
पुणे : ‘स्टार प्रवाह’ या मराठी वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील ‘शौनक जहागीरदार’ ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या योगेश माधव सोहनी या अभिनेत्याला एक्सप्रेस हायवे वर भर दिवसा लुटण्यात आले. शनिवारी सकाळी हा प्रकार घडला.तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (शिरगाव चौकी) तक्रार दाखल करून चारचाकी वाहनाच्या अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता योगेश सोहनी हे एक्सप्रेस हायवे वरून पुण्याकडे जात असतांना सोमाटणे एक्झिटजवळ एक पांढऱ्या रंगाचे काळ्या काचा असलेली चारचाकी वाहन आली . त्या वाहनाच्या चालकाने हात दाखवून सोहनी यांना थांबण्याचा इशारा केला.त्यामुळे सोहनी यांनी गाडी थांबवली असता तुझ्या गाडी मुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे व एका इसमाला दुखापत झाली आहे असे सांगितले . तसेच या अपघाताची कायदेशीर तक्रार पोलिसांकडे करायचे नसेल तर तू एक लाख पंचवीस हजार रुपये दे नाहीतर तुझ्यावर पोलीस केस होईल, असे सांगून सोहनी यांना भिती दाखवली. तसेच शिवीगाळ करून दमदाटी ही केली. त्यानंतर सोमाटणे फाटा येथील एटीएममधून ५० हजार रुपये काढण्यास भाग पाडून फिर्यादी सोहनी यांच्याकडून ती रक्कम घेऊन निघून गेले.
दरम्यान, पैसे घेऊन आरोपी निघून गेल्याने फिर्यादी सोहनी यांना संशय आला. तसेच काही जणांकडून माहिती घेतली असता एक्सप्रेस हायवेवर अपघात झाला नसल्याचे फिर्यादी सोहनी यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी सोमवारी पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी सुरू केली आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 11, 2021, 4:05 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY