मोठी बातमी! राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील लोकांच्या लसीकरणाला ब्रेक?; राजेश टोपेंचे संकेत
मुंबई : कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम सुरू आहे. परंतु महाविकास आघाडी सरकारने लसींचा तुटवडा असल्याचे सांगत अनेक लसीकरण केंद्रे बंद ठेवली आहेत. त्यामुळे आता पुन्हा लसीकरणाचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. आज महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिलेल्या माहितीनुसार, वय वर्ष 18-44 साठी राज्य सरकारने विकत घेतलेला कोवॅक्सिनचा (Covaxin) डोस आता 45 वर्षांवरील आणि दुसर्या डोससाठी पात्र असलेल्या नागरिकांना दिले जाणार आहे. 5 लाख लोकं सध्या कोवॅक्सिनच्या दुसर्या डोससाठी प्रतिक्षेमध्ये आहेत. त्याच्या तुलनेत साठा कमी असल्याने आता आरोग्यमंत्र्यांनी काळजी व्यक्त केली आहे.
बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे…
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत असून, बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. 2 लाख टेस्टिंग राज्यात केले जात आहे. लसीकरण 1 कोटी 84 लाख झाले आहे. आता 35 हजार कोव्हॅक्सिन उपलब्ध आहे. राज्य शासनाने खरेदी केलेली 3 लाख कोव्हॅक्सिन 45 वर्षांवरील व्यक्तींना दिल्या जाणार आहेत, त्यांना दुसरा डोस देणे गरजेचं आहे. त्यामुळे हे डोस 45 पुढील वयोगटांना दिले जाणार आहेत, असं टोपे यांनी स्पष्ट केलं.
मंत्रिमंडळाच्या चर्चेनंतर पुढील निर्णय…
वय 18 ते 44 या वयोगटातील लस देण्याचे जाहीर केले होते. पण लशीचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. याशिवाय ज्यांनी आधीच पहिला डोस घेतलेला आहे, त्यांना वेळेवर दुसरा डोसही देणे गरजेचे आहे. यामुळे लसींचा तुटवडा पाहता 18 ते 44 या वयोगटातील लशीचा साठा हा 45 वरील वयोगटाकडे वळवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आहे. त्यामुळे 18 वर्षांवरील लसीकरणाचा वेग काही दिवस स्लोडाऊन करावा लागेल. टास्क फोर्स तसेच मंत्रिमंडळाच्या चर्चेनंतर पुढील निर्णय घेऊ, असेही राजेश टोपे म्हणाले.
दुसरीकडे, म्युकोरमायकोसिसचे रुग्ण काही जिल्ह्यांत आढळले आहेत. त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार केले जाणार आहेत. त्यासाठी लागणाऱ्या औषधांचा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचंही टोपेंनी स्पष्ट केलं.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 11, 2021, 3:28 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY