Breaking News

राज्यात 30 मे पर्यंत लॉकडाऊन वाढणार?; मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री निर्णय घेण्याची शक्यता

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 11, 2021 1:49 pm
|

मुंबई: राज्यात कोरोना संक्रमणाच्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. यामुळे किंचित दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. आकड्यांमध्ये दिलासा असला तरीही राज्यात पुन्हा 15 दिवस म्हणजेच 30 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवले जाऊ शकते. सूत्रांनुसार, बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. या दरम्यान राज्याच्या 11 शहरांमध्ये हार्ड लॉकडाऊन सुरू आहे. येथे दूध, किराणा आणि भाजीच्या दुकाना वगळता सर्व काही बंद आहे. या शहरांमध्ये ऑनलाइन फूड आणि इतर आवश्यक वस्तूंची डिलीवरी सुरू आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात सर्वाधिक प्रादुर्भाव झाला होता. राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, सोमवारी कोरोनाचे 37 हजार 236 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यापूर्वी राज्यात सातत्याने 60 हजारांच्या वर रुग्णसंख्या आढळत होती. राज्यातील एकूण बाधितांची आकडेवारी 51 लाख 38 हजार 973 वर गेली आहे. सध्या राज्यात 5 लाख 90 हजार 818 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर राज्यात 24 तासांत 549 रुग्णांचा मृत्यूही नोंदवण्यात आला आहे. यामुळे एकूण मृत्यूंचे प्रमाण वाढून 76 हजार 398 पर्यंत पोहोचले आहे. आतापर्यंत राज्यातील 44 लाख 69 हजार 425 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या 36.70 लाख लोक होम क्वारंटाइन आहेत आणि 26,664 रुग्ण इंस्टिट्यूशनल क्वारंटाइन आहेत. राज्यात 7 लाखापर्यंत पोहोचलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होऊन 6 लाखांपेक्षा कमी झाली आहे.

मुंबईमध्ये संक्रमितांच्या तुलनेत दुप्पट रुग्ण झाले बरे

मुंबईमध्येही कोरोनाचा प्रभाव सलग कमी होत आहे. सोमवारी येथे 1,794 नवीन प्रकरणे समोर आली. मात्र याच्या दुप्पट म्हणजेच 3,580 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले. येथे रविवारी 2,403 केस नोंदवण्यात आल्या होत्या, तर 3,375 रुग्ण बरे झाले होते.

राज्यात मोफत होणार म्यूकोरमाइकोसिसवर उपचार

पुणे, मुंबईच्या शहरी भागांमध्ये रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र ग्रामिण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी म्हटले की, म्यूकोरमाइकोसिसच्या रुग्णांवरील उपचार राज्य सरकारच्या प्रमुख वैद्यकीय विमा योजनानुसार राज्याच्या 1 हजार हॉस्पिटलमध्ये मोफत केला जाईल. म्यूकोरमाइकोसिस एक दुर्मिळ कवक (फंगल) इन्फेक्शन असते. जे आता कोरोना व्हायरसने संक्रमित असलेल्या व्यक्तींमध्ये समोर येत आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 11, 2021, 1:49 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *