Breaking News

Bihar: खळबळजनक! बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील गंगा नदीत मृतदेहांचा खच,24 तास जळत आहे चिता; अनेक मृतदेह थेट नदीत प्रवाहित

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 10, 2021 7:39 pm
|

बिहार: भारतात आलेल्या कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. कोरोना महामारीचा उद्रेक दिवसेंदिवस वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर बिहारच्या बक्सर जिल्ह्यात मानवतेला लाजवेल असे चित्र समोर येत आहे. दरम्यान, सोमवारी चरित्रवनमधील स्मशानभूमीत लोकांना जाळण्यासाठी जागा उरली नाही. या लाटेत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असूनही मृतांचाही आकडेवारी चिंताजनक आहे.यातच बिहारच्या (Bihar) बक्सरमधील (Buxar) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चौसातील (Chausa) महादेव घाट (Mahadev Ghat) परिसरात कोरोना रुग्णांच्या मृतदेहाचा खच पडल्याचे कळत आहे. परंतु, हे सर्व प्रेत उत्तर प्रदेशमधून वाहत आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मृतदेह मिळाल्यानंतर परिसरातील मोठ्या साथीच्या भीतीमुळे लोक घाबरले आहेत. कोरोनाच्या मृत्यूनंतर लोक मृतदेहदेखील जळत नाहीत, तर त्याऐवजी अंत्यसंस्काराच्या नावाखाली त्यांना गंगेमध्ये फेकत आहेत असा संशय आहे. शेकडो मृतदेह गंगा नदीत तरंगत आहेत. तरंगणारा मृतदेह सापडल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, यामधील जास्तीत जास्त रुग्ण खोकला आणि तापीचे होते. चौसा स्मशानभूमीत येणार्‍या बहुतेक मृतदेहांना गंगेमध्ये टाकण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

स्थानिक असंतोष

स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार मृतदेहांची संख्या जवळपास दीडशे असल्याचे समजते. चरित्रवन आणि चौसा स्मशानभूमीत 24 तास मृतदेह जळत असून मृतदेहांची रांग लागलेली आहे. यापूर्वी चौसा स्मशानभूमीत प्रतिदिन 2 ते 5 मृतदेह जळत होते. परंतु, आता तेथे 40 ते 50 मृतदेह जळत आहे. बिहार जिल्ह्यातील बक्सरमध्ये रविवारी, 90 मृतदेहांची अधिकृत नोंद झाली होती. परंतु, तेथे 100 लोकांवर अंत्यसंस्कार केले जात आहे. स्मशानभूमीत दररोज 20 हून अधिक लोक नोंदणी देखील करत नाहीयेत. चौसामध्येही 25 मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यामधील 7 मृतदेहांना जाळले तर इतर 16 मृतदेहांना नदीत वाहून दिले आहे.कोरोना रुग्णांचे मृतदेह घाट परिसरात येत आहेत. जर भटक्या कुत्र्यांनी हे मृतदेह खाल्ल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो,अशी भिती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले प्रशासन

चौसाचे बीडीओ अशोक कुमार यांनी सांगितले की, हे सर्व प्रेत मोठ्या संख्येत वेगवेगळ्या ठिकाणाहून वाहून महदेव घाटावर आले आहेत. हे प्रेत बिहारमधील नाहीत. त्यांचे म्हणणे आहे की हे मृतदेह 5 ते 7 दिवस जुने असून ते उत्तर प्रदेशातून बिहार येथे आल्याचा संशय आहे. त्यांना दफन करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने तयारी सुरू आहे. यूपी प्रशासनाबरोबरही याबाबत चर्चा होईल.आम्ही एक पहारेकरी ठेवला आहे, ज्याच्या देखरेखीखाली लोकांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. महत्वाचे म्हणजे, उत्तर प्रदेशमधून येणाऱ्या या प्रेतांना रोखण्याचा कोणताही मार्ग नाही. आम्ही या प्रतांच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 10, 2021, 7:39 pm
Tags:
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *