Breaking News

मोदी सरकार म्हणजे पाकिटमार, लोकांचे खिसे कापतंय

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 10, 2021 2:52 pm
|

मुंबई – देशात डिझेल व पेट्रोलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल काही दिवसांत शंभरच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. जगात दर कमी असताना भारतात किंमती कशा वाढवल्या जातात, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला केला आहे.

केंद्र सरकार जनतेचे खिसे कापण्याचे काम करत आहे. हे सरकार पाकिटमार सरकार बनलेय असा थेट आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.देशात कोरोनाचे संकट असताना पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवणे याचे पडसाद महागाई वाढण्यावर होत आहेत त्यामुळे लोकांची लूट थांबवावी आणि जगात पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत तेच भारतात असावेत असे सांगतानाच तेलाची लूट थांबवावी अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

दरम्यान, गेले दोन दिवस इंधनाच्या किंमती स्थिर राहिल्यानंतर आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सलग चार दिवसांच्या दरवाढीनंतर पेट्रोलचा दर हा 87 पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलीटर 1 रुपयांची वाढ झाली होती. आजही देशाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात 18 ते 27 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किंमतीत 26 ते 35 पैसे प्रतिलिटरपर्यंत वाढ झाली आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 10, 2021, 2:52 pm
Tags:
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *