शरद पवारांचे कट्टर विरोध; माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे निधन
बारामतीचे माजी खासदार आणि जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते संभाजीराव(लाला) काकडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. 90 वर्षीय काकडे यांनी पुण्यातील राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला. बारामती लोकसभा मतदारसंघातून संभाजीराव दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून काकडेंची ओळख होती.
बारामती तालुक्यातील निंबुत येथील एक वजनदार घराणे म्हणून काकडेंचा लौकिक होता. 1967 साली काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर ते महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले. तसेच, माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या निकटच्या सहकाऱ्यांपैकी एक होते. यानंतर, संभाजीराव 1977 मध्ये भारतीय लोक दलातर्फे, तर 1985 मध्ये जनता दलातर्फे बारामतीतून लोकसभेवर निवडून गेले होते. यापूर्वी त्यांनी आमदारकी भूषवली होती. आज त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी उद्या (दि.10) दुपारी 2:30 वाजता होणार आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 10, 2021, 2:32 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY