काँग्रेस खासदार राजीव सातव कोरोनामुक्त; लवकरच मिळणार डिस्चार्ज
पुणे : राज्यात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) फैलाव वेगाने होत आहे. मृतांचा आकडाही वाढला आहे.त्यामुळे कोरोनाला थोपवण्यासाठी लसीकरण मोठ्या प्रमाणावर होणे गरजेचे असल्याचे तज्ञांचे मत आहे. तर . डॉक्टरांच्या मेहनतीमुळे अनेकजण कोरोनावर मात करताना देखील दिसू येत आहेत. यातच आता काँग्रेसचे नेते तसंच खासदार राजीव सातव कोरोनामुक्त झाले असल्याचे वृत्त समोर आले आहे.
तब्बल 19 दिवसांनी त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सध्या त्यांच्यावर सामान्य वॉर्डमध्ये देखरेखीखाली उपचार करण्यात येत आहेत. लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याचं वृत्त समोर आले आहे.
सातव यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, काही दिवसांची त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यामुळे त्यांना तातडीने मुंबईला हलवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यासाठी लीलावती हॉस्पिटलच्या टीमने पुण्यात येऊन तपासणी केली होती. त्यानंतर पुण्यात त्यांच्यावर उपचार सुरू राहतील, असं स्पष्ट करण्यात आले होते.
उपचाराअंती राजीव सातव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. अखेरीस 19 दिवसांच्या उपचारानंतर राजीव सातव यांची कोरोनाची चाचणी निगेटीव्ह आली आहे. त्यांना लवकरच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येण्याची शक्यता आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 10, 2021, 1:44 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY