सलमान खानची मोठी घोषणा, 25 हजार मजुरांच्या खात्यात प्रत्येकी 1500 रुपये ट्रान्सफर करणार
मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भाव दिवसागणिक वेगाने वाढत असल्याने लॉकडाऊनमध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वाढ होत आहे. यामुळे लोकांची मानसिक व आर्थिक स्थिती धोक्यात आली आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूडचा भाईजान सलमान खान पुन्हा एकदा गरजुंच्या मदतीसाठी सरसावला आहे. रोजंदारीवरील मजुरी लक्षात घेऊन सलमान खानने एक मोठे पाऊल उचलले आहे. दैनंदिन मजुरी कामगारांना मदत करण्यासाठी त्याने आता 25 हजार मजुरांना प्रत्येकी 1500 रुपये देणार आहे. ही रक्कम थेट या सर्वांच्या खात्यात जमा केली जाईल. कोरोनाच्या संकटात मदत म्हणून सलमान या मजुरांना पैसे देणार आहे. जेणेकरून प्रत्येक गरजू व्यक्तीला मदत मिळावी आणि या कठीण काळात ते आपले घर चालवू शकतील
सलमान खान पुन्हा एकदा मेकअप मेन, टेक्निशियन, स्पॉटबॉय अशा 25 हजार लोकांना मदत करणार आहे. जेणेकरून या कठीण काळात आपले जीवन जगू शकतील. कोरोनाच्या पहिल्या फेरीत त्याने एफडब्ल्यूईसीशी संबंधित कामगारांना मदत केली आहे. सलमान खान कामगारांच्या खात्यात 1500 रुपये ट्रान्सफर करेल. इतकेच नव्हे तर कोरेनाच्या लढाईत राधेच्या कमाई या चित्रपटाद्वारे मिळालेले पैसेही ते देणगी देणार आहे . . फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज ः (एफडब्ल्यूईसी) चे अध्यक्ष बीएन तिवारी यांनी याची माहिती दिली आहे. त्याचवेळी बीएन तिवारी सरचिटणीस अशोक दुबे आणि कोषाध्यक्ष गंगेश्वर श्रीवास्तव आणि मुख्य सल्लागार अशोक पंडित, शरद शेलार यांनी सांगितले की सलमान खान व्यतिरिक्त नेटफ्लिक्स आणि निर्माते बॉडी गिल्ड आणि सिद्धार्थ रॉय कपूर, मनीष गोस्वामी यांच्यासह सात हजार लोकांना पाच-पाच हजार मदत करेल. तसेच एफडब्ल्यूईसीशी संबंधित चार संघटना यश चोप्रा फाउंडेशनच्या वतीने , यश राज फिल्म्सच्या वतीने, अलाइड मजदूर युनियनशी संबंधित कामगार, ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशन, महिला आर्टिस्ट असोसिएशन, जनरेटर व्हॅनिटी व्हॅन अटेंडंट असोसिएशन (ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे) )या सर्व कामगारांना पाच-पाच हजार व कुटुंबातील चार सदस्यांनुसार एक महिन्यांचे रेशन दिले जाईल.
https://www.instagram.com/p/COo_yiwji0W/?utm_source=ig_web_copy_link
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 8, 2021, 6:36 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY